महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सापडलेले मंगळसूत्र केले परत

10:40 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अगसगेत माजी सैनिक पत्नीचे कौतुक

Advertisement

वार्ताहर /अगसगे

Advertisement

अगसगे येथे एका महिलेचे हरवलेले मंगळसूत्र एका माजी सैनिकाच्या पत्नीने प्रामाणिकपणे परत केले. माणुसकीच्या दृष्टीने ते परत केल्याने तिचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील श्री कलमेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर रविवार दि. 4 रोजी कमलव्वा श्रीकांत गडकरी या महिलेचे मंगळसूत्र पडले होते. याच मार्गावरून जाताना माजी सैनिकाची पत्नी रुपा जोतिबा कडोलकर या महिलेला ते  सापडले होते. यावेळी परिसरातील घरामध्ये मंगळसूत्र कोनाचे आहे. अशी विचारपूस केली. पण कुणीही पुढे आले नाही. यामुळे रुपा कडोलकर यांनी आपले पती जोतिबा कडोलकर याना वरील माहिती दिली. ते मंगळसुत्र जोतिबा कडोलकर यांनी देवस्थान पंच कमिटीकडे सुपूर्द केले. पंच कमिटीने मंगळसूत्र कोणाचे हरवले असल्यास ते घेऊन जाण्याचे गावामध्ये दवंडी देऊन आवाहन केले. त्यानंतर कमलव्वा यांनी मंगळसूत्र आपले आहे असे सांगून, त्याची ओळख पटविल्यानंतर रविवार दि. 11 रोजी रुपा कडोलकर यांच्याहस्ते कमलव्वा यांच्या सुपूर्द केले. यामुळे रुपा कडोलकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुपा आणि त्यांच्या पतीचे देवस्थान कमिटीतर्फे आभार मानले. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे बसनगौडा पाटील, निंगाप्पा गडकरी, दुंडाप्पा पाटील, सिद्धलिंग मुद्देन्नवर, गौडाप्पा पाटील उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article