महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर प्रदेशमधील कल्कीधाम मंदिराची पायाभरणी

06:15 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींची मुख्य उपस्थिती : संभलमधील अंकारा कंबोह भागात मंदिर बांधले जाणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ संभल

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्कीधाम मंदिराची पायाभरणी करण्यात आली. हे मंदिर संभलच्या अंकारा कंबोह भागात बांधले जाणार आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा झाली होती. कल्की मंदिर हे विष्णूचा दहावा आणि शेवटचा अवतार असलेल्या कल्कीला समर्पित आहे. कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्कीच्या रूपात प्रकट होतील, असे सनातन धर्मात मानले जाते. या बाबतीत, हे मंदिर जगात अद्वितीय करण्याचा प्रयत्न ट्रस्टकडून सुरू आहे.

कल्कीधाम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रत्यक्ष सहभागी झाले होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोमवारी येथे पूजा करण्यात आली. आचार्य प्रमोद कृष्णम हे श्री कल्कीधाम कन्स्ट्रक्शन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सुमारे 18 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान मोदी पायाभरणी सोहळ्यात सहभागी झाले होते. अलीकडेच काँग्रेसने प्रमोद कृष्णम यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करून त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती.

अद्वितीय बनवण्याचा प्रयत्न

कल्कीधाम मंदिरात 10 गर्भगृहे असतील. या दहा गर्भगृहांमध्ये दहा वेगवेगळ्या अवतारांची स्थापना केली जाईल. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे अयोध्येतील राम मंदिर आणि सोमनाथ मंदिरात वापरण्यात आलेल्या गुलाबी दगडाने हे मंदिर बांधले जाणार आहे. या मंदिरातही स्टील किंवा लोखंडाचा वापर केला जाणार नाही. हे मंदिर 5 एकरावर बांधले जाणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी किमान 5 वर्षे लागतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article