महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एसकेई सोसायटीचा उद्या स्थापना दिन

11:39 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : शिक्षण क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविलेल्या साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता आरपीडी-जीएसएसच्या के. एम. गिरी सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, निमंत्रित म्हणून राजमाता राणी पार्वती देवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले व अध्यक्ष म्हणून एसकेईचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

सुनीलकुमार लवटे यांचा परिचय

पंढरपूर येथे जन्मलेले डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रतिकुल परिस्थितीत हिंदी विषयात एमए व पीएचडी पदवी घेतली. भारत सरकारची शिष्यवृत्ती व महाराष्ट्र शासनाचा निर्वाह भत्ता यांच्या बळावर ग्रामीण विद्यापीठाच्या पदवी समकक्ष शिक्षक पदविकेत भारतात प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. भारत सरकारने त्यांना ‘रोल ऑफ ऑनर’ने गौरविले. साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांचा सहवास आणि सतत वाचन यामुळे आयुष्यभर एक समर्पित शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यरत राहून ते निवृत्त झाले.

हायस्कूल शिक्षक असतानाच डॉक्टरेट मिळवून महाविद्यालयात, महाविद्यालयात पुस्तके लिहून विद्यापीठात व प्राचार्य उपक्रमांचा उच्चांक त्यांनी केला आहे. अनाथांचे संगोपन व पुनर्वसन यासाठी सतत दोन दशके प्रयत्नशील राहिले. कोल्हापूरच्या रिमांड होमचे ‘बाल कल्याण संकुलना’मध्ये त्यांनी रुपांतर केले. भारतीय शिष्टमंडळातून युरोप, आशिया खंडांतून 15 देशांचे दौरे केले. महाराष्ट्रातील अनाथाश्रम, रिमांड होम्स, प्रशासन यंत्रणेचे विकेंद्रीकरण, बालकांचा राष्ट्रीय कायदा व हक्क अशा विविध क्षेत्रात काम करून सध्या सर्व पदांचा त्याग करून ते मुक्तपणे कार्यरत आहेत.

मराठी आणि हिंदी भाषेमध्ये त्यांनी विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनास महाराष्ट्र फौंडेशनचा, भाषांतर व समीक्षेस भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने त्यांना जीवनगौरव तर महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्काराने गौरविले आहे. ‘कोल्हापूर भूषण’ हा नागरी सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. विविध पुरस्कारांतून मिळालेला निधी त्यांनी समाजासाठी दिला असून सध्या पंचाहत्तरीत प्रवेश करताना 1 कोटीहून अधिक रक्कम समाजासाठी दिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article