महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस पक्षाचा 28 रोजी स्थापना दिन

12:12 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : काँग्रेस पक्ष आपला 138 वा स्थापना दिवस 28 डिसेंबर रोजी पक्षाच्या म्हापसा येथील जिल्हा कार्यालयात तसेच राज्यभरात इतर ठिकाणी साजरा करणार आहे. यानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (Aघ्ण्ण्) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. म्हापसा जिल्हा कार्यालयात त्या दिवशी सत्यनारायण महापूजा आणि ध्वजारोहण होणार आहे. यावेळी काँग्रेसचे आमदार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार आहेत. महाप्रसादानंतर भजनाचा कार्यक्रमही होणार आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी 2 कार्यकर्त्यांना त्यांच्या स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे  पक्षाच्या उत्तर जिल्हा समितीचे संघटक सचिव प्रणव परब यांनी सांगितले. प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विजय भिके यांनी सर्व राजकीय पक्ष आणि सर्व धर्माच्या नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या उत्सवाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. गेल्या 12 वर्षात, आपण पाहिले आहे की राज्य चुकीच्या दिशेने जात आहे, तऊण कसे चुकीच्या मार्गावर जात आहेत. आम्ही आमच्या लोकांच्या भल्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, राज्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. नवीन वर्षात बेकायदेशीर गोष्टी आणि चांगल्या गोष्टींचा सामना करणे, असे भिके यांनी सांगितले

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article