हिंमतीने लढली, दुखापतीमुळे 30 सेकंदात हरली
06:45 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ लंडन
Advertisement
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू निशा दहियाला कुस्तीच्या 68 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. महिलांच्या 68 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत ती 8-1 अशी आघाडीवर होती, परंतु तिला दुखापत झाली आणि शेवटच्या काही सेकंदात 10-8 असा पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतरही निशाला पदकापर्यंत पोहोचण्याची संधी आहे. कुस्तीच्या नियमांनुसार, जर निशाला पराभूत करणारी कोरियाची कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचली, तर निशाला रेपेचेजमध्ये संधी मिळेल, ज्याद्वारे ती कांस्यपदकापर्यंत पोहोचू शकेल. तत्पूर्वी, निशाने पहिल्या फेरीत युक्रेनच्या कुस्तीपटूचा 6-4 असा पराभव केला. बराच वेळ सामना 4-4 असा बरोबरीत राहिला आणि अखेरच्या सेकंदात गुण मिळवून सामना जिंकला.
Advertisement
Advertisement