कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाच लाख पर्यटकांकडून 'किल्ले सिंधुदुर्ग' दर्शन

01:39 PM May 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

मालवण :

Advertisement

नव्याने उभारण्यात आलेला राजकोट येथील शिवपुतळा, मालवण शहर आणि ऐतिहासिक 'किल्ले सिंधुदुर्ग' पाहण्यासाठी पर्यटकांनी यावर्षी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाखाहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्याची अधिकृत आकडेवारी बंदर विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. २०२४-२५ च्या पर्यटन हंगामात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी ५ लाख १५ हजार ८०६ पर्यटकांनी हजेरी लावली. यंदाची आकडेवारी पाहता, यंदाचा हंगाम पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देणारा ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हंगाम समाप्तीला पाच दिवस शिल्लक राहिलेले असतानाच निसर्गाने केलेल्या वादळी आक्रमणामुळे २० मेपासूनच जलपर्यटनाला ब्रेक लागला. अन्यथा या आकडेवारीत आणखी ५० हजारांची मर पडली असती, मोठ्या संख्येने आजही पर्यटक मालवणमध्ये दाखल होत आहेत.

Advertisement

सन २०२२-२३ च्या पर्यटन हंगामात एकूण २.३६.७६५ पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्यावर हजेरी लावली. यात ३ ते १२ बयोगटातील ३६ हजार, तर त्यापुढील वयोगटातील ३.७६५ पर्यटकांचा समावेश हीता. २०२३-२४ च्या पर्यटन हंगामात किल्ला पाहण्यासाठी ४,०३,३०९ पर्यटकांनी हजेरी लावली. यात ३ ते १२ वयोगटातील ४७ हजार ७७६, तर त्यापुढील वयोगटातील ३,५५,५३३ पर्यटकांनी हजेरी लावली. २०२४-२५ च्या पर्यटन हंगामात किल्ला पाहण्यासाठी ५.१५,८०६ पर्यटकांनी हजेरी लावली मात ३ ते १२ वयोगटातील ५०८८७, तर त्यापुढील बयोगटातील ४,६४,९१९ पर्यटकांनी हजेरी लावली. मे महिन्यातील आकडेवारी सरासरी अंदाजात घेण्यात आली आहे. ही माहिती बंदर विभागातर्फे सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी दिली

केंद्र सरकारच्या इनलैंड व्हेसल अॅक्ट १९१७नुसार १ सप्टेंबर ते २५ मेपर्यंतचा कालावधी सागरी जलपर्यटनासाठी ठरवून देण्यात आता आहे. मात्र, बन्चाचदा खराब हवामान, लांबलेल्या तसेच अवेळी पडणाऱ्या पावसामुळे मोक्याचा हंगाम पर्यटन व्यावसायिकांना गमवावा लागतो. राज्यात पडणारा अवकाळी पाऊस आणि बाइळी हवामानामुळे या कालावधीत मालवणात येणाऱ्या पर्यटकांचा ओप कमी होत असतो. पंदाच्या पर्यटन हंगामातही बदलत्या हवामानाचा परिणाम थोडाफार जाणवला दहावी आणि बारावीच्चा निकाल लागल्यानंतर अखेरच्या टण्प्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मात्र, इतर राज्यांतील पर्यटक कमी प्रमाणात आले. अन्यथा पर्यटकांची संख्या ३० ते ४० हजाराने नक्कीच वाढली असती. हवामान बदलामु‌ळे जाणवणारा हा परिणाम वगळता कोरोनानंतर मालवणचे पर्यटन पूर्वपदावर आल्याचे संकेत यंदाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसून आले. साधारणतः मोठ्या गटातील नऊ पर्यटकांमागे ३ ते १२ वयोगटातील एक पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आला, असे आकडेवारी सांगते.

२० मेपासून वादळी पाऊस झाल्याने जत्तपर्यटनाला ब्रेक लागला. गतवर्षी आणि यावर्षीही बंदर विभागाने २५ मे रोजीच सागरी जलपर्यटन समाप्तीची घोषणा करीत त्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तसेच वादळी पावसात जलपर्यटन बंद करण्यासाठीही बंदर विभागाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली होती. यात में २०२२ मध्ये ४५ हजार ३०७३ मोठे, तर ३,६९८ छोटे अशा एकूण ४९,०७१ पर्यटकाची नोंद बंदर विभागाकडे झाली होती. २०२३ मे महिन्यात सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची संख्या ५७,६३९ आहे. २०२४ मे महिन्यात ८५,३२५ पर्यटकांनी भेट दिली. तुलनेत यंदा में महिन्यात लहान ८७,२०२ पर्यटकांनी मेट दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे दोन हजार पर्यटकांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते. काही दिवसांची मुदतवाढ मिळाली असती, तर हा आकडा नक्कीच लाखापर्यंत पोहोचला असता. एप्रिल २०२२ मध्ये मोठे पर्यटक २८,२५६, तर लहान पर्यटकांची संख्या १३४३ इतकी होती. एप्रिल २०२३ मध्ये मीठे ३५,५९१, तर लहान ८७० इतकी होती. एप्रिल २४ मध्ये ३० हजार मोठे, तर १४ हजार लहान पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले. एप्रिल २५ मध्ये ३९,१२६ मीठे तर ५९५ लहान पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले.

आर्थिक वर्षानुसार होणान्या पर्यटन गणनेचा विचार करता, २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३ लाख २१ हजार ३४३ पर्यटकांची नोंद झाली आहे. तर २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात १,७४,२५२ पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर हजेरी लावत्ती होती. म्हणजेच एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आर्थिक वर्षात १४७०९१ एवढे जास्त पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले. २०२४ मध्ये ४,०३,३०९ पर्यटकांनी भेट दिली होते. यावर्षी ५,१५,८०६ पर्यटकांनी भेट दिली आहे. गतवर्षपिक्षा यावर्षी अधिक १,१२,४९७ पर्यटक मालवणमध्ये दाखल झाले होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article