For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमिनी विक्री रोखण्यासाठी धोरण बनवा : वळवईकर

12:40 PM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
जमिनी विक्री रोखण्यासाठी धोरण बनवा   वळवईकर
Advertisement

जुने गोवेतील भूऊपांतरणास प्रखर विरोध : नगरनियोजन खात्याला निवेदन सादर

Advertisement

पणजी : जमिनी विकू नका, असे लोकांना सांगणे सोपे आहे, परंतु विद्यमान सरकारच लोकांनी अधिकाधिक जमिनी विकाव्यात यासाठी कायद्याची कलमे बदलून ती प्रक्रिया अधिक सोपी बनविण्यासाठी धडपडत आहे, असा आरोप कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते समील वळवईकर यांनी केला आहे. जुने गोवे येथील एका प्रस्तावित भूऊपांतरणास विरोध करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाच्या वतीने ते बोलत होते. कुंभारजुवे मतदारसंघातील या शिष्टमंडळाने शुक्रवारी पणजीत नगरनियोजन खात्याला प्रखर विरोधाचे निवेदन सादर केले आहे. त्यावर सुमारे 350 जणांनी सह्या केल्या आहेत.

लोकांनी जमिनी विकू नये असे सरकारला खरोखरच वाटत असेल तर त्यांनी तसे धोरण तयार करावे. याऊलट सरकारच 17 (2) आणि 39 (ए) यासारख्या दुऊस्त्यांद्वारे जमिनी विकण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळेच आज गोव्यात जमीन विक्रीचा अक्षरश: बाजार मांडलेला आहे.  हरी आणि जंगली भागातील बहुतांश जमिनी बिगर गोमंतकीयांच्या घशात गेल्यानंतर हे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. हे चित्र असेच चालू राहिल्यास पुढील काही वर्षांतच स्थानिक अल्पसंख्याक बनतील अशी भीती वळवईकर यांनी व्यक्त केली.

Advertisement

जुने गोवेतील मोती डोंगर भागात एका चर्चच्या लगतची 1.64 लाख चौ. मी. जमीन एका बिगर गोमंतकीयाने खरेदी केली असून तिची ऊपांतरण प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. त्यासंबंधी राजपत्रातही नोटीस प्रसिद्ध झाली आहे. मात्र ही जमीन जुने गोवेतील जागतिक वारसा स्थळात येत आहे. अशावेळी या परिसरात काँक्रिटीकरण होतच राहिल्यास युनेस्कोकडून कदाचित या भागाची वारसा मान्यता काढून घेण्यात येण्याची भीती आहे, असे वळवईकर म्हणाले. त्यामुळे या भागात कोणतेही बांधकाम होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

खरे तर ही जमीन एक डोंगराळ भाग असून तेथे या जमिनीत पाणथळ जमीन, नो डेव्हलपमेंट झोन आहे. अन्य नैसर्गिक स्रोत आहेत. अशावेळी या जमिनीचे ऊपांतरण जाल्यास या संपूर्ण स्रोतांचा संहार होईल. भविष्यात वायनाड सारखी परिस्थितीही उद्भवू शकेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आज आम्ही टीसीपीमध्ये केवळ शिष्टमंडळच घेऊन आलो आहोत. सरकारने आमची मागणी गांभीर्याने न घेतल्यास या विषयाला मोठ्या आंदोलनाचे स्वरूप देण्यात येईल, असा इशाराही वळवईकर यांनी यावेळी दिला. त्यावेळी सां-मातियशच्या सरपंच सुप्रिया तारी, गोलती नावेलीचे सरपंच मारियो पिंटो, पंचसदस्य प्रसाद हरवळकर, करमळीचे पंचसदस्य राजेश नाईक, जुने गोवेचे पंचसदस्य अंबर आमोणकर, सांत ईस्तेव्हचे उपसरपंच सुकूर, स्वप्नील भोमकर, आदींची उपस्थिती होती.

Advertisement
Tags :

.