महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेचे माजी विदेशमंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन

06:50 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Advertisement

वृत्तसंस्था/ कनेक्टिकट

Advertisement

अमेरिकेचे माजी विदेशमंत्री हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या 100 व्या वर्षी कनेक्टिकट येथील निवासस्थानी निधन झाले आहे. किसिंजर यांच्या निधनाची घोषणा त्यांच्या सल्लागार कंपनीने एका वक्तव्याद्वारे केली आहे. परंतु त्यांचे निधन कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विद्वान, राजकीय नेता, प्रख्यात मुत्सद्दी असलेले किसिंजर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या प्रशासनाच्या काळात आणि त्यांनंतर एक सल्लागार तसेच लेखक म्हणून काम केले. अमेरिकेच्या आधुनिक विदेश धोरणाच्या निर्मितीत त्यांची मोठी भूमिका होती. किसिंजर यांना जागतिक राजकारण आणि व्यापाराला आकार देणारी शक्ती देखील मानले गेले.

हेंज अल्फ्रेड किसिंजर यांचा जन्म 27 मे 1923 रोजी जर्मनीच्या फर्थमध्ये झाला होता. ते 12 वर्षांचे असताना नूर्नबर्ग कायद्यांमुळे जर्मनीच्या ज्यूंकडून नागरिकत्व हिरावून घेण्यात आले होते. किसिंजर यांचे कुटुंब ऑगस्ट 1938 मध्ये जर्मनीतून बाहेर पडत अमेरिकेत पोहोचले होते. अमेरिकेत पोहोचल्यावर त्यांचे नाव हेन्री झाले होते. ते अनेक वर्षांपर्यंत न्यूयॉर्कमध्ये एका नातेवाईकाच्या घरी राहत होते.

विदेश धोरणावर पूर्ण नियंत्रण

एकाचवेळी व्हाइट हाउसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि अमेरिकेचे विदेशमंत्री होणारे हेन्री एकमात्र व्यक्ती होते. अमेरिकेच्या विदेश धोरणावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते.

वादांशी मोठे नाते

किसिंजर यांचे वादांशी मोठे नाते राहिले आहे. किसिंजर आणि व्हिएतनामचे ले डक थो यांना गोपनीय चर्चेसाठी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता. परंतु त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.  किसिंजर आणि ले डक थो यांच्यातील चर्चेमुळे 1973 चा पॅरिस करार झाला आणि व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेच्या सैन्याची भागीदारी समाप्त झाली होती. पूर्व पाकिस्तानातील नरसंहारावेळी हेन्री यांनी पाकिस्तानला साथ दिली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याचबरोबर भारतीय तसेच इंदिरा गांधी यांना उद्देशून उच्चारलेल्या आक्षेपार्ह टिप्पणींमुळे ते वादग्रस्त ठरले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article