कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेचे माजी एनएसए जॉन बोल्टन दोषी

06:45 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गंभीर आरोपांमुळे जन्मठेप होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॉन बोल्टन यांच्यावर अमेरिकेच्या एका संघीय ग्रँड ज्युरी न्यायालयाने गुन्हेगारी आरोप लावले आहेत. त्यांच्यावर पदाचा गैरवापर आणि गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. बोल्टन यांच्यावर राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित माहिती शेअर करण्याचे आठ आणि गोपनीय कागदपत्रे बाळगण्याचे 10 असे एकंदर 18 आरोप आरोप आहेत. आता त्यांना दोषी आढळल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

76 वर्षीय बोल्टन यांची गेल्या काही काळापासून वर्गीकृत माहितीचा गैरवापर केल्याबद्दल चौकशी सुरू होती. अलिकडच्या आठवड्यात ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात उतरले होते. आता त्यांच्यावर फौजदारी आरोप लावण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये बोल्टन यांनी 2018-19 पर्यंत एनएसए म्हणून काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात वर्गीकृत नोंदी चुकीच्या पद्धतीने ठेवण्यासह एकंदर 18 आरोप ठेवण्यात आले आहेत.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प प्रशासनात काम करताना जॉन बोल्टन यांनी त्यांच्या कारवायांबद्दलच्या नोट्स आणि डायरीच्या नोंदी ई-मेल अकाउंटमध्ये जतन केल्या होत्या. या नोट्समध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती होती. ही माहिती त्यांनी स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबाला ई-मेल केली होती.  2021 मध्ये बोल्टन यांचे ईमेल अकाउंट इराणी हॅकर्सनी हॅक केले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article