माजी केंद्रीय मंत्री शरद पवार गोव्यात
12:26 PM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे काल गोव्यात आले असून ते विश्रांतीकरिता आल्याचे वृत्त आहे. ते बांबोळी येथील एका खासगी तारांकित हॉटेलमध्ये राहिले आहेत. उद्या दि. 5 रोजी दुपारच्या विमानाने ते पुण्याला रवाना होतील. मात्र त्यांच्या स्वागतासाठी खुद्द त्यांच्या पक्षाचा देखील कोणीही नेता विमानतळावर पोहोचला नव्हता.
Advertisement
Advertisement