महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सुझुकी’चे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकींचे निधन

10:56 PM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष आणि सीईओ ओसामू सुझुकी यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. लिम्फोमामुळे त्यांचे देहावसान झाल्याची माहिती शुक्रवारी कंपनीकडून जारी करण्यात आली. ओसामू सुझुकी यांनी चार दशके कंपनीचे नेतृत्व करत ‘सुझुकी’ला जागतिक बनवले. सुझुकीला भारतात मजबूत बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते 1978 ते 2021 अशा वयाच्या 91 व्या वर्षापर्यंत सुझुकी कंपनीचे अध्यक्ष, चेअरमन आणि सीईओ पदावर कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीची विक्री 300 अब्ज येन (1.9 अब्ज डॉलर्स) वरून 3 ट्रिलियन येन झाली. ही दहापट वाढ त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा असल्याचे मानले जाते.

Advertisement

ओसामू सुझुकी यांचा जन्म 30 जानेवारी 1930 रोजी जपानमधील गिफू प्रांतात झाला होता. 1958 मध्ये ते विवाहबद्ध झाले होते. तर 1978 मध्ये कंपनीचे अध्यक्ष झाले. ओसामू सुझुकी 2015 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यांनी आपला मुलगा तोशिहिरो सुझुकीकडे कंपनीची सूत्रे सोपवली. परंतु, त्यांनी 2021 पर्यंत कंपनीला चेअरमन म्हणून दिशा देणे सुरूच ठेवले. त्यांच्या नेतृत्वाखाली, सुझुकी मोटरची उपकंपनी मारुती सुझुकी इंडियाने 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय कार बाजारात 41.7 टक्के हिस्सा राखला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article