कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी नेमबाजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचे निधन

06:29 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

Advertisement

भारताचे माजी नेमबाजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय नेमबाजीने उंची गाठली. त्यात ऑलिम्पिकमध्ये अनेक पदके मिळविण्याचाही समावेश आहे.

Advertisement

84 वर्षीय सनी थॉमस यांचे कोट्टायम येथील निवासस्थानीच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी केजे जोसम्मा व मुले मनोज सनी, सनिल सनी व मुलगी सोनिया सनी असा परिवार आहे. माजी नेमबाज असलेल्या थॉमस यांनी 1993 ते 2012 या कालावधीत भारतीय नेमबाजांना मार्गदर्शन केले होते. या क्रीडाप्रकाराच्या इतिहासात भारतीयांनी जी अपूर्व कामगिरी केली, त्याचे ते पहिले साक्षीदार होते. 2001 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004 मध्ये राजवर्धन सिंग राठोड यांनी डबल ट्रॅप नेमबाजीत रौप्य मिळविले हेते. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत वैयक्तिक पदक जिंकणारे ते पहिले नेमबाज बनले होते. त्यावेळी सनी थॉमस हे कोचिंग स्टाफमध्ये होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article