कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : कर्जमाफीसाठी माजी खासदार संजयकाका पाटील करणार उपोषण !

02:09 PM Oct 30, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

     सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण ३१ ऑक्टोबरला

Advertisement

सांगली : सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करा या मागणीकरिता माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्यावतीने शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता , जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

Advertisement

यावेळी संजयकाका पाटील म्हणाले, सांगली जिल्हयामध्ये सध्याअतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सांगली जिल्हयातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढ्या व बँकामधून कर्ज घेतात, परंतु शेतीपिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणे शक्य होत नाही. जिल्हयातील शेतकऱ्यांची हिच अवस्था असल्याने त्यांना नाहक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदिल आहे. शेतीपिकाचे नुकसान होवूनही कर्ज वसुलीकरिता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत.

याकरिता उपाय म्हणून जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे. राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करणेसाठी हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले. शेतकरी हिताचा व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. सध्या शेतकरी नेते बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसहीत इतर मागण्याकरीता राज्यभरात आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनासही आमचा पाठिंबा आहे, असे संजयकाका पाटील यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#agriculturenews#FarmerRights#farmersprotest#MaharashtraFarmers#sanglinews#SatbaraKora#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article