For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी आमदार शिवराम दळवी राजकारणात सक्रिय

04:05 PM Apr 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
माजी आमदार शिवराम दळवी राजकारणात सक्रिय
Advertisement

लोकसभा निवडणुकीत भाजपचा करणार प्रचार - दळवी

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

दहा वर्षांपूर्वी भाजपचे कमळ हाती घेतलेले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी आज सावंतवाडी येथील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली. या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण प्रचार दौरे करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले .श्री दळवी यांनी मतदार संघात जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे .सावंतवाडीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,उमेश कोरगावकर राजा शिवाजी चौक मित्र मंडळातील पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी चर्चा केली.दळवी सध्या राजकारणापासून अलिप्त होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता त्यानंतर ते गेल्या विधानसभा निवडणुकीत तटस्थ होते. गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी युतीचा धर्म पाळला होता. आता पुन्हा एकदा ते ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज भाजपच्या कार्यालयात भेट देत कमळ पुन्हा एकदा हाती घेतले आहे .श्री दळवी यांच्यावर मुंबईचीही जबाबदारी देण्यात आली आहे .त्यांचे सुपुत्र गोपाळ दळवी ,सिद्धिविनायक दळवी हेही मुंबईमध्ये राजकारणात सक्रिय आहेत . एकंदरीत , माजी आमदार शिवराम दळवी यांनी पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आपली एन्ट्री केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.