महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बंगालच्या कालव्यात सापडला माजी मंत्र्याचा मृतदेह

06:49 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9 दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते सिक्कीमचे माजी मंत्री

Advertisement

वृत्तसंस्था/ गंगटोक

Advertisement

सिक्कीमचे माजी मंत्री आर. सी. पौड्याल यांचा मृतदेह ते बेपत्ता झाल्याच्या 9 दिवसांनी पश्चिम बंगालच्या सिलिगुडीनजीक एका कालव्यात सापडला आहे. बुधवारी यासंबंधी पोलिसांनी माहिती दिली आहे. 80 वर्षीय पौड्याल यांचा मृतदेह फुलबारीमध्ये तीस्ता कालव्यात आढळून आला आहे. हा मृतदेह तीस्ता नदीच्या वरच्या हिस्स्यातून वाहत खाली आला असावा, मृतदेहाची ओळख हातावरील घड्याळ आणि शरीरावर कपड्यांद्वारे झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

7 जुलै रोजी पाक्योंग जिल्ह्यातील छोटा सिंगतम या शहरातून पौड्याल बेपत्ता झाले होते. त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. पौड्याल यांच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू होणार आहे. पौड्याल हे सिक्कीमच्या पहिल्या विधानसभेचे उपाध्यक्ष होते आणि पुढील काळात ते राज्याचे वनमंत्री झाले होते असे पोलिसांनी सांगितले आहे.

70 आणि 80 च्या दशकाच्या अखेरीस त्यांना हिमालयीन राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती मानले जायचे. पौड्याल यांनी रायजिंग सन पक्षाची स्थापना केली होती. सिक्कीमची सांस्कृतिक आणि सामाजिक रचनेची पूर्ण ओळख असणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते.

पौड्याल यांच्या मृत्यूप्रकरणी सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. एस. तमांग यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रतिष्ठित वरिष्ठ राजकारणी स्वर्गीय आर. सी. पौड्याल ज्यू यांच्या आकस्मिक निधनामुळे मी अत्यंत दु:खी आहे. पौड्याल यांनी मंत्री म्हणून विविध पदांवर काम करत सिक्कीमची सेवा केली होती असे तमांग यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article