महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भाजपमध्ये सामील

06:21 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रोहित आर्य भाजपमध्ये सामील झाले आहेत. ते सुमारे तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले होते. रविवारी त्यांनी भोपाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. राघवेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत पक्ष सदस्यत्व स्वीकारले आहे. 2013 मध्ये आर्य हे मध्यप्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. माजी न्यायाधीश आर्य यांनी पदावर असताना दिलेले अनेक निर्णय चर्चेत राहिले होते. यात प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जामीन देण्यास नकार देणारे प्रकरण देखील सामील होते.

Advertisement

2021 मध्ये आर्य यांनी नववर्षाच्या कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाप्रकरणी मुनव्वरला जामीन देण्यास नकार दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत मुनव्वर फारुकीला जामीन मंजूर केला होता.

2020 मध्ये अन्य एका प्रकरणी त्यांनी महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचविल्याप्रकरणी आरोपीला रक्षाबंधन दिनी तक्रारदार महिलेकडून राखी बांधवून घेत तिचे रक्षण करण्याचे वचन देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. रोहित आर्य यांच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देखील पालटविला होता. रोहित आर्य यांनी यापूर्वी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होतो अशी जाहीर कबुली दिली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article