महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माजी गव्हर्नर डॉ.पटेल ब्रिटानियाच्या संचालक मंडळात

06:52 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पटेलांच्या प्रवेशाने कंपनीचे समभाग चमकले

Advertisement

नवी दिल्ली  :

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ.उर्जित पटेल यांची एफएमसीजीमधील दिग्गज कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात समावेश करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्यांना अतिरिक्त बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक करण्यात आले आहे. जेणेकरून कंपनीच्या संचालक मंडळाचा कारभार बळकट होईल. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. 2 जुलै 2024 ते 1 जुलै 2029 पर्यंत ते कार्यरत असतील. या वर्षाची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा 12 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. त्यात या निर्णयाला मान्यता दिली जाणार असल्याची माहिती आहे.

आरबीआयचे 24 वे गव्हर्नर

डॉ. उर्जित पटेल यांनी 2016 ते 2018 पर्यंत आरबीआयचे 24 वे गव्हर्नर म्हणून काम केले. यासोबतच त्यांनी आर्थिक सुधारणा आणि आव्हानांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. आरबीआयमधील त्यांच्या कार्यकाळात ते आंतरराष्ट्रीय सेटलमेंटसाठी बँकेचे सदस्यही होते.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत

आरबीआयचे गव्हर्नर होण्यापूर्वी डॉ. उर्जित पटेल यांनी आरबीआयमध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. जानेवारी 2013 पासून त्यांनी आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला. त्या काळात त्यांनी माहिती व्यवस्थापन, आर्थिक संशोधन, आर्थिक धोरण अशा विविध पदांवर महत्त्वाची कामे केली.  त्यांनी 2022 ते 2024 पर्यंत एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.

ब्रिटानियाचा वाटा

बुधवारी म्हणजेच 3 जुलै रोजी ब्रिटानियाच्या शेअरमध्ये वाढ झाली. हा समभाग सकाळी 5420 रुपयांवर उघडला. त्यानंतर या शेअरने तेजीची नोंद केली. जे दुपारी 1 वाजेपूर्वी समभाग 5,469.50 रुपयांवर पोहोचले. मागील पाच दिवसांत या समभागाने गुंतवणूकदारांना 1.26 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्याचा परतावा 5.83 टक्के होता आणि सहा महिन्यांचा परतावा 4.13 टक्के होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article