कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी पोलीस महासंचालक विरोधात पुत्राच्या हत्येचा आरोप

06:27 AM Oct 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी, मुलगी आणि सुनेच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी पोलीस महासंचालकावर पुत्र अकील अख्तरच्या हत्येचा आरोप आहे. 16 ऑक्टोबर रोजी अकील अख्तरचा मृतदेह आढळून आला होता. हत्येपूर्वी अकीलने एक व्हिडिओ जारी करत स्वत:च्या पित्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी  तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे.  पोलीस स्थानकात हत्या आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंद करण्यात आला. एफआयआरमध्ये मुस्तफा, राज्याच्या माजी मंत्री रजिया सुल्ताना, अकील अख्तरची पत्नी आणि त्याच्या बहिणीला आरोपी करण्यात आले आहे.

Advertisement

 अनैतिक संबंधांचा आरोप

अकीलने मृत्यूपूर्वी व्हिडिओ जारी करत धक्कादायक दावे केले होते. अकीलने पिता मोहम्मद मुस्तफा यांच्यावर सुनेसोबत अनैतिक संबंध  ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच आई रजिया सुल्ताना आणि बहिण माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप अकीलने केला होता.

परिवाराचा दावा

अकीलचा मृत्यू अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचा दावा परिवाराने केला होता. मोहम्मद मुस्तफा हे 2021 मध्ये पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात सामील झाले. त्यांच्या पत्नी रजिया सुल्ताना या काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्या तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत, तसेच त्या पंजाबच्या मंत्री राहिल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article