माजी नगरसेविकेचे पाणी कनेक्शन तोडले
कोल्हापूर :
थकीत पाणीपट्टी प्रकरणी नोटीस बजावूनही पाणी पट्टी न भरणाऱ्या सदर बाजार परिसरातील माजी नगरसेविकेचे कनेक्शन गुरुवारी पाणीपुरवठा विभागाने खंडीत केले. माजी नगरसेविकेने अर्धातास केलेला विरोध झुगारुन पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने त्या माजी नगरसेविकेचे कनेक्शन तोडून सर्वांना एकच न्याय असल्याचे दाखवून दिले. शहरात गुरुवारी पाणीपुरवठा विभागाने 23 कनेक्शन खंडीत करुन 9 लाख 14 हजार रुपयांची पाणीपट्टी वसुल केली.
गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सदरबाजार, भंडारे गल्ली, गुरव माळ, ताराबाई पार्ग, कारंडे मळा, शाहु कॉलेज पिछाडीस, गुरव मळा, गंगावेश, पापाची तिकटी, दत्त गल्ली इत्यादी भागामध्ये कारवाई करुन थकबाकीदारांवर कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी 23 कनेक्शन खंडीत करुन रक्कम रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुल केली.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवेगार, प्रिया पाटील, अनुराधा वांडरे, महानंदा सुर्यवंशी, पथक प्रमुख अजित मोहिते, मधु कदम, अमर बागल, नरेंद्र प्रभावळकर, संजय पाटील यांनी केली.
- माजी नगरसेविकेचा विरोध
सदर बाजार परिसरात कारवाई सुरु असताना माजी नगरसेविका माया भंडारी यांनी या कारवाईस विरोध केला. यावेळी पाणीपुरवठा विभागातील पथकाने त्यांना तुमची 54 हजार रुपये थकबाकी असून ती भरा आम्ही कनेक्शन तोडणार नाही असे सांगितले. मात्र थकबाकी आम्ही मार्च महिन्यानंतर भरतो असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.