For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन
Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि माकप नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी निधन झाले आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी कोलकाता येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे मागील काही काळापासून आजारी होते. त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. भट्टाचार्य यांनी 2000-11 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. तर 1977-2000 पर्यंत ज्योति बसू यांच्या नेतृत्वात राज्यात माकपचे सरकार होते. सलग 34 वर्षे सत्तेत राहिल्यावर 2011 मध्ये माकपला तृणमूल काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत पराभूत केले होते.

बुद्धदेव यांच्या मागे  पत्नी मीरा आणि कन्या सुचेतना असा परिवार आहे. पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या भट्टाचार्य यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जनम 1 मार्च 1944 रोजी कोलकात्यातील एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांचे आजोबा कृष्णचंद्र स्मृतितीर्थ हे बांगलादेशच्या मदारीपूर जिल्ह्याचे रहिवासी होते. तसेच ते संस्कृत विद्वान, पुजारी आणि लेखक होते. तसेच त्यांनी पुरोहित दर्पण नावाने एक पुरोहित मॅन्युअलची निर्मिती केली होती. जी पश्चिम बंगालच्या बंगाली हिंदू पुजाऱ्यांमध्ये आजही लोकप्रिय आहे. बुद्धदेव यांचे पिता नेपालचंद्र हे कौटुंबिक प्रकाशन सारस्वत लायब्रेरीत कार्यरत होते. बुद्धदेव यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बंगाली साहित्यात पदवी मिळविली होती. यानंतर ते शासकीय शाळेत शिक्षक झाले होते. 2022 मध्ये भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.