’जेएसडब्ल्यू’ नावाने बनावट पत्र्यांची खुलेआम विक्री : योगी कार्पोरेशन कंपनीवर गुन्हा
पावणेदोन लाखाचा साठा पकडला
कुपवाड प्रतिनिधी
बामनोलीत एका कारखान्यात ’जेएसडब्ल्यू’ कंपनीच्या नावाने बनावट पत्र्यांची निर्मिती करून त्याची ग्राहकांना खुलेआम विक्री सुऊ केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याबाबत जेएसडब्ल्यू कंपनीच्या तक्रारीनुसार योगी कार्पोरेशन कंपनी विरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
या कारवाईत कंपनीच्या टीमने योगी कारपोरेशन कारखान्यात ठेवलेला 1 लाख 79 हजार 340 ऊपयांचे 122 बनावट पत्र्यांचा साठा पकडला आहे. यात योगी कार्पोरेशनने जेएसडब्ल्यू कंपनीच्या पत्र्याचे ’जेएसडब्ल्यू कलर ऑन प्लस’ असे बनावट नक्कल केल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी योगी कार्पोरेशन कंपनीचे संचालक संशा†यत परेश चंपकलाल शहा ( वय 58,रा.माधवनगर रोड, सर्कीट हाऊस जवळ, पाटीलनगर, सांगली) यांच्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात हंबीरराव ज्ञानू साठे (रा.18/5 बीडीडी चाळ, नारायण मल्हार जोशी मार्ग, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू कंपनीचे प्रतिनिधी हंबीरराव साठे व त्यांची टीम सांगली जिल्हा द्रौयावर आली होती. यावेळी त्यांना कंपनीच्या नावाने बनावट नक्कल केलेले जेएसडब्ल्यू पत्रे तयार करून विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. साठे यांच्या टीमने बामणोली येथील योगी कार्पोरेशन या कंपनीत जाऊन पाहणी केली. यावेळी योगी कंपनीने स्वत:च्या फायद्यासाठी कारखान्यात जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे पत्र्याचे बेकायदेशीर जेएसडब्ल्यू कलर ऑन प्लस असे नमूद बनावट नक्कल केलेले पत्रे आढळले. अंदाजे 1 लाख 79 हजार 340 ऊपयांचे 122 पत्र्याचे नग तयार करून त्याचा साठा विक्रीस ठेवल्याचे मिळून आल्याने कंपनीने जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे मूळ स्वा†मत्वचे हक्काचे उलंघन केले असल्याची तक्रार हंबीरराव साठे यांनी कुपवाड पा†लस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आ†धक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.