Satara News : कोळेवाडीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वन विभागाकडून सुटका
विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाने दिलं जीवदान!
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोळेवाडी (ता. कराड) येथील गोसावी मळा शिवारात कोल्हा विहिरीत पडल्याचे स्थानिकांना दिसून आले. शेतमालकाने तात्काळ गावातील पोलीस पाटलांना या संदर्भात माहिती दिली, तर पोलीस पाटलांनी वनविभागास कळवून तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी, कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी व डब्ल्यू आर के (WRK) टीमचे सदस्यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढले.
रेस्क्यू पूर्ण झाल्यानंतर कोल्हा स्वतःहून शेतातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या संपूर्ण धाडसी बचाव मोहिमेचे गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी कौतुक केले. “वन विभाग आणि WRK टीमने अतिशय शौर्याने व तत्परतेने काम केलं,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.