महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फॉरेन्सिक पथकाकडून धिरयोचा पर्दाफाश

11:09 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जेनिटोच्या छातीत, पायात शिंग खुपसले : ना गोठ्याची ना रेड्याच्या शिंगाला रक्त,कुटंबियांकडून परस्पर विरोधी माहिती,धिरयोच्या व्हिडिओत सारा प्रकार उघड

Advertisement

मडगाव : कोपेवाडा-बाणावली येथे आयोजित करण्यात आलेल्या धिरयोत जेनिटो वाझ (41 वर्षे) याच्या छातीवर डाव्या बाजूने तसेच दोन्ही पायांवर रेड्याने शिंग खुपसल्याने त्याला मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काल मंगळवारी फॉरेन्सिक पथकाने गोठ्याला भेट देऊन पाहणी केली. मात्र, गोठ्यात रक्ताचे डाग किंवा अन्य काहीच संशयास्पद आढळून आले नाही. या प्रकरणात कोलवा पोलिस गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती मडगावचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली. मयत जेनिटो वाझ यांच्या कुटुंबियांनी गोठ्यात गुरांना खावड घालताना त्याला रेड्याने शिंग खुपसल्याने मृत्यू आल्याचे म्हटले आहे. तरीही धिरयोच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने धिरयोतील रेड्याने जेनिटोवर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. जेनिटोच्या कुटुंबियांनी तपास यंत्रणेची दिशाभूल केल्याचेही उघड झाले आहे.
Advertisement

शिंग खुपसल्याचे शवचिकित्सेत स्पष्ट

काल मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात जेनिटो वाझ याच्यावर शवचिकित्सा करण्यात आली. त्यावेळी त्याच्या छातीवर डाव्या बाजूने तसेच दोन्ही पायांवर गुडघ्याजवळ शिंग खुपसल्याने त्याला मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले. छातीवर डाव्या बाजूने त्याला खोलवर जखम झाली आहे. फॉरेन्सिक पथक जोपर्यंत घटनास्थळी भेट देऊन तपासणी करीत नाही, तोपर्यंत मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करणे यंत्रणेला शक्य झाले आहे.

व्हिडिओतून सारा प्रकार उघड

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धिरयो सुरू असताना त्यातील एक रेडा उधळला व त्याने जेनिटो वाझ याच्यावर शिंगाने हल्ला केला, जमिनीवरुन फरफट नेले. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला, हे सारे स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार होण्यापूर्वीच त्याला मृत्यू आला. जेनिटो वाझ याच्या कुटुंबियांनी गोठ्यात घटना घडल्याचा दावा केला तरी त्यात तथ्य नसल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

पशुवैद्यकीय डॉक्टराला पाचारण

फॉरेन्सिक पथक बाणावलीत दाखल झाल्यानंतर कोलवा पोलिसांच्या मदतीने तपासकामाला सुरुवात झाली. यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टराची मदत घेण्यात आली. जेनिटो वाझच्या पत्नीने शिंग खुपसण्याची घटना गोठ्यात झाल्याचे सांगितल्याने गोठ्याची तपासणी करण्यात आली. परंतु, फॉरेन्सिक पथक तसेच पशुवैद्यकीय डॉक्टराला त्या ठिकाणी रक्ताचे डाग किंवा अन्य संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही. शिंग खुपसण्यात आलेल्या रेड्याच्या शिंगाला रक्त लागले होते. ते पाण्याने साफ करण्यात आले आणि त्यानंतर रेडा गोठ्यातून बाहेर गेला व पुन्हा सकाळी गोठ्यात आला अशी कथित माहिती तपास यंत्रणेला देण्यात आली.

पोलिसांची केली दिशाभूल

व्हायरल झालेला व्हिडिओ पोलिसांनी पाहिल्यानंतर पोलिसांना देखील सत्य परिस्थिती कळून चुकली. गोठ्यात घटना घडली असती तर गोठ्यात रक्ताचे डाग तपास यंत्रणेला सापडले असते. त्याचबरोबर रेड्याच्या शिंगालादेखील रक्त लागल्याचे आढळून आले असते. पण, तसे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्यात आल्याचे तपास यंत्रणेच्या लक्षात आले. मंगळवारी सायंकाळी मडगावचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या प्रकरणी कोलवा पोलिस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मयत जेनिटो वाझ याच्या पत्नीवर देखील गुन्हा नोंद होऊ शकतो असे प्रभुदेसाई म्हणाले.

थंड डोक्याचे अधिकारी....

सोमवारी ही घटना घडल्यानंतर तपास यंत्रणेवर तसेच शवचिकित्सा डॉक्टरावर देखील प्रचंड दबाव आला होता. मात्र, या दबावासमोर न झुकता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला. त्यामुळेच सत्यपरिस्थितीपर्यंत जाणे तपास यंत्रणेला शक्य झाले. सोमवारी जेव्हा घटना घडली, त्यानंतर जेनिटो वाझ याला मडगावातील एका खासगी हॉस्पिटलात नेण्यात आले होते. मात्र, तो मृत असल्याने हे प्रकरण कोलवा पोलिसांपर्यंत पोचले. उपनिरीक्षक सुभाष गावकर हे हॉस्पिटलात दाखल झाले व त्यानतंर मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आला. तेव्हा रात्रीच्यावेळी शवचिकित्सा करावी यासाठी डॉक्टरांवर दबाव आला. मात्र, रात्री शवचिकित्सा केली जात नसल्याचे सांगून डॉक्टरांनी शवचिकित्सा करण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला. जर शवचिकित्सा करून मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केला असता तर या प्रकरणातील गांभीर्य हरवले असते. शवचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मधु घोडकिरेकर, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई व कोलवाचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता या अधिकाऱ्यांनी अगदी शांत डोक्याने या प्रकरणाचा सखोल तपास होण्यावर भर दिला.

पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर...

गोवंश संरक्षण अभियानचे हनुमंत परब यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना केवळ पोलिसांच्या आशीवार्दानेच अशा धिरयोचे आयोजन होत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसला. राजकारणी लोक मताच्या पेटीवर नजर ठेऊन अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असतात. धिरयोतील बैल किंवा रेडा दगावला किंवा एखादी व्यक्ती मृत पावली तरी त्यांना काही फरक पडत नाही. न्यायालयाने बंदी घातली असताना देखील धिरयोचे आयोजन होण्यामागे पोलिस व राजकीय आशीवार्द कारणीभूत असल्याचे मत हनुमंत परब यांनी मांडले. गोवंश संरक्षण अभियानचे हनुमंत परब यांनी काल संध्याकाळी या संदर्भात कोलवा पोलिस स्थानकावर अधिकृत तक्रार नोंद केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article