महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उद्यापासून इराण दौऱ्यावर

06:30 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांचा तेहरान दौरा होत आहे. परराष्ट्रमंत्री सोमवारी इराणला रवाना होतील. या दौऱ्यात लाल समुद्रातील चिघळलेल्या परिस्थितीसह अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा करण्याची शक्मयता आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर त्यांचे इराणचे समकक्ष होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी चर्चा करतील. लाल समुद्रातील विकसित होत असलेल्या सुरक्षा परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. अमेरिका आणि ब्रिटनने याआधीच येमेनमधील हुथी स्थानांवर हवाई हल्ले सुरू केल्यामुळे समुद्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात अमेरिका आणि ब्रिटनच्या कारवाईमुळे पश्चिम आशियामध्ये संघर्ष वाढण्याची शक्मयता आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सोमवारी इराण दौऱ्यावर रवाना होणार आहेत. हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी त्यांनी दिली आहे. यामुळे गाझा युद्धामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष होऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. हुथी बंडखोरांनी अलीकडेच लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article