विदेशी गुंतवणुकदारांनी काढले 26 हजार 533 कोटी
नवी दिल्ली :
नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत विदेशी पोर्टपोलिओ गुंतवणुदारांनी 56533 कोटी रुपयांची रक्कम शेअर बाजारातून काढून घेतली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक गुंतवणूकदार चीनमधील बाजारामध्ये गुंतवणूक करण्यात रस घेत असल्याचे दिसून येत आहे.
विदेशी गुंतवणूकदार गेले काही दिवस सातत्याने पैसे काढून घेत आहेत. सातत्याने भारतीय शेअर बाजारामध्ये पैसे काढण्याचा माहोल पहायला मिळतो आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये निव्वळ रुपामध्ये 94 हजार 17 कोटी रुपये शेअरबाजारातून काढले होते. अमेरिकेमध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला असून त्यांचे सरकार जानेवारीमध्ये अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणानंतरच विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजाराप्रतीचा गुंतवणुकीचा कल लक्षात येऊ शकणार आहे. 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत 26533 कोटी रुपये विदेशी गुंतवणुकदारांनी काढले आहेत.