महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी गुंतवणूक 9 महिन्यांच्या उच्चांकावर

06:05 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : शेअरबाजारातील विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूक नऊ महिन्याच्या उच्चांकावर पोहचली असल्याची माहिती आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात 57 हजार 359 कोटी रुपयांची शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली होती. सदरची विदेशी गुंतवणुकी नऊ महिन्यांमधली सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्हने व्याज दरात कपात केल्यानंतर पाहता विदेशी गुंतवणुकीत सर्वाधिक वाढ झाली आहे. 2024 मध्ये पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक केली आहे. 27 सप्टेंबर पर्यंत पाहता विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 57 हजार 359 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी सर्वाधिक गुंतवणूक डिसेंबर 2023 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 66 हजार 135 कोटी रुपयांची केली होती. सप्टेंबरमधली गुंतवणूक 9 महिन्यातली सर्वाधिक मानली जाते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article