महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी चलन साठा नव्या उच्चांकावर

06:38 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

देशातील विदेशी चलन साठा 5 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात 5.16 अब्ज डॉलर्सने वाढत 657.16 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंबंधीची माहिती दिली आहे. याआधीच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 1.71 अब्ज डॉलरने घटून 651.99 अब्ज डॉलरवर राहिला होता. यावर्षी 7 जून रोजी देशाचा विदेशी चलन साठा 655.82 अब्ज डॉलर्स या सर्वकालीक उच्चांकावर पोहचला होता. याचदरम्यान 5 जुलैच्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्ता 4.23 अब्ज डॉलरने वाढत 577.11 अब्ज डॉलर्सवर पोहचली होती. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार सुवर्ण साठा 90.4 कोटी डॉलरने वाढत 57.43 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article