For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठा 653 अब्ज डॉलरवर

06:37 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठा 653 अब्ज डॉलरवर
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

21 जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील विदेशी चलन साठा 0.81अब्ज डॉलर्सने वाढून 653.71 डॉलरवर पोहोचला होता. या आधीच्या म्हणजे 16 जून रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यामध्ये 2.92 अब्ज डॉलर्सची घसरण झाली होती. त्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 652.89 अब्ज डॉलरवर राहिला होता. या आधीच्या म्हणजेच सात जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये चलन साठ्यामध्ये दमदार अशी 4.30 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 21 जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन मालमत्ता 0.11 अब्ज डॉलरने घटून 574.13 अब्ज डॉलरवर राहिली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.