ट्रकमध्ये संसार थाटणारं विदेशी जोडपं
पत्नी नोकरी सोडून देत पतीसोबत देश हिंडतेय
पती-पत्नीचे नाते हे अत्यंत वेगळ्या प्रकारचे असते. अनेकदा पती किंवा पत्नीला कामानिमित्त परस्परांपासून दूर जावे लागते, परंतु दुसरा जोडीदार स्वत:चे काम सोडून पार्टनरसोबत ट्रिपवर जाण्याचा प्रकार फारच कमी घडतो. अमेरिकेच्या महिलेने मात्र असेच केले आहे. तिचा पती एक ट्रकचालक होता, अनेकदा बाहेरच असायचा, महिलेने स्वत:चे नोकरी सोडून देत पतीसोबत ट्रकमध्येच वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. आता ती पतीसोबत मिळून देश हिंडत आहे.
29 वर्षीय मिला हॉर्टन अमेरिकेच्या अटलांटा येथील रहिवासी आहे, तिचा 31 वर्षीय पती जर्मने एका कंपनीत ट्रकचालक आहे. तो मोठमोठे फ्रिज अमेरिकेच्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पोहोचवितो, त्याचा बहुतांश वेळ ट्रकमध्ये जातो आण प्रवास अनेक दिवसांचा असतो. दोघांची भेट 2017 मध्ये झाली होती, त्या मिला विमानतळावर इलेक्ट्रिक कार्ट ड्रायव्हर होती, दोघांनी 2018 मध्ये डेटिंग सुरू केले आणि 2019 मध्ये विवाह केला होता. 2021 मध्ये जर्मेनने पत्नीला स्वत:सोबत ट्रकमध्ये राहण्याचा देश हिंडण्याची कल्पना सुचविली.
मिला हिला बालपणापासूनच हिंडण्याचा छंद होता. मग तिने स्वत:ची नोकरी सोडली आणि घराचे सामान स्टोरेजमध्ये टाकून पतीसोबत देश फिरण्यासाठी त्याच्या ट्रकमध्ये राहू लागली. पतीने एक नवा ट्रक खरेदी केला, तो ज्या कंपनीसाठी काम करतो, त्यात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सिबल वर्क आहे. तो स्वत:च्या मर्जीनुसार मार्ग निवडू शकतो आणि कंपनी त्याला सोबत जोडीदार राखण्याची अनुमती देते. ट्रकमध्येच त्यांनी किचन तयार केला आहे. तसेच बेडरुम निर्माण करत त्यातच राहण्यास सुरुवात केली आहे. ट्रक स्टॉप्स किंवा पेट्रोल पंपावर थांबून ते स्नान करतात आणि उर्वरित कार्ये आटोपतात, मग पुन्हा स्वत:च्या ट्रकमध्ये जातात.
जबाबदाऱ्यांचे वाटप
या जोडप्याने आतापर्यंत अमेरिकेतील बहुतांश राज्यांचा प्रवास केला आहे. केवळ न्यूयॉर्क, वरमॉन्ट, न्यू हॅमशायर, मेन, कनेक्टिकट, मॅसाच्युसेट्स अणि रॉड आयलँडला त्यांनी भेट दिलेली नाही. जर्मेन ट्रक चालवितो, तर मिला दोघांसाठी स्वयंपाक करते. दोघेही ट्रकमध्ये आरामात राहतात, परंतु 24 तास एकत्र राहिल्याने दोघांमध्ये भांडणही होतात. याचमुळे दोघेही परस्परांना पर्सनल स्पेस देखील देतात. आता मी पतीसोबत देश हिंडत असून हा माझ्यासाठी अत्यंत अनोखा अनुभव असल्याचे मिलाचे सांगणे आहे.