कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News : 'या' कारणामुळे वाळव्याचे सरपंच कांबळे यांचं सर्वत्र होतंय कौतुक !

03:01 PM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

                                                          पाणीपुरवठा विस्कळीत, सरपंच उतरले खड्यात

Advertisement

वाळवा : येथील महात्मा फुलेनगर परिसरात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे लिकेज कामासाठी स्वतः सरपंचानी खड्ड्यांमध्ये उतरून मदत केली. सलग ४ दिवस लिकेज काढण्याचे काम सुरु होते. संततधार पडणारा पाऊस, कामाच्या ठिकाणी असलेला गुडघाभर चिखल यांसह तांत्रिक अडचणीमुळे कामात अडथळे येते होते.

Advertisement

वाळव्यातील आदर्श सरपंच कै. शंकर परुळेकर यांची गावकऱ्यांना त्यामुळे प्रकर्षाने आठवण झाली, वाळवा गावाचा पिण्याचा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला आहे, पाणीपुरवठा साठी वापरल्या जाणाऱ्या दोन विद्युत मोटरपैकी एक मोटर नादुरुस्त झाल्यामुळे विस्कळीतपणा आला होता.

उपसरपंच चंद्रशेखर शेळके, सरपंच संदेश कांबळे यांनी शर्थीचे प्रयत्न करीत वाळव्यातला पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. कोटभाग येथे महात्मा फुलेनगर व भागातील, परिसरातील संपूर्ण पाणीपुरवठा गेले काही () दिवस बंद होता. ग्रामपंचायतची पाणीपुरवठा योजना स्थापन झाल्यानंतर जमिनीमध्ये पाणीपुरवठासाठी सिमेंटच्या पाईपा घातल्या आहेत. त्या सध्या जीर्ण होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पुसेसावळी ते नागठाणे फाटा रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

रस्त्याच्या खुदाईमुळे महात्मा फुलेनगर येथे कोटभागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे नादुरुस्त झाली. सरपंच संदेश कांबळे यांनी गावातील पाणीपुरवठा दुरुस्त करण्यासाठी स्वतः खड्ड्यांमध्ये उतरून जेसीबी व मजुरांच्या साह्याने तेथील लिकेजचे काम दोन दिवसात पूर्ण केले , या कामासाठा सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ धुमाळे, अविनाश जाधव यांनी चांगले सहकार्य केले.

कर देऊन सहकार्य करावे-संदेश कांबळे

बोलताना म्हणाले, पत्रकारांशी ग्रामपंचायतच्या निधीतून बरीच कामे करावी लागतात. निधी अभावी कामे खोळंबून राहतात, लोकांना चांगली सेवा देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. गावची लोकसंख्या ४० हजारांच्या आसपार असून प्रति माणसी ५५ लिटर पाणी पाईपलाईनद्वारे पाठवले जाते, गावाची पेजल योजना अंतिम टप्यात आहे, आड स्टॉप येथे पाणी पुरवठ्याची चौथी टाकी बांधून पूर्ण होत आहे. त्यानंतर गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. गावाची करवसुली सव्वादोन कोटीच्या आसपास आहे. सर्व गावकऱ्यांनी वेळेवर करवसुली देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे., असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Advertisement
Tags :
@#tbdsangli@sanglinews# water issue#Maharastra#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article