कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहलगाम हल्ल्याचा प्रथमच चीनकडून तीव्र निषेध

06:21 AM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानला दाखवला ‘आरसा’ : टीआरएफवर बंदी घालण्याचे समर्थन

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisement

काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने पहिल्यांदाच तीव्र निषेध नोंदवला आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट करताना चीनने पाकिस्तानला ‘आरसा’ दाखवला आहे. लष्कर-ए-तोयबाची संलग्न संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ला (टीआरएफ) दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचेही चीनने समर्थन केले आहे. चीनच्या या टिप्पणीवर पाकिस्तानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु पाकिस्तानमध्ये दहशतवादाला पोसणाऱ्यांना चीनच्या या विधानामुळे निश्चितच राग आला आहे हे स्पष्ट आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ‘टीआरएफ’ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांना बीजिंगमध्ये आयोजित मीडिया ब्रीफिंगमध्ये याबद्दल विचारणा केली असता त्यांनी ‘चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला ठामपणे विरोध करतो आणि 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो’ असे स्पष्ट केले. चीन सहकारी देशांना दहशतवादविरोधी सहकार्य वाढवण्याचे आणि संयुक्तपणे प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता राखण्याचे आवाहन करतो, असे लिन जियान म्हणाले.

अमेरिकेने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर चीनचे हे विधान पुढे आले आहे. चीनने पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना अमेरिकेप्रमाणे ‘टीआरएफ’चे नाव घेऊन टीका केली नसली तरी ‘टीआरएफ’ला थेट दहशतवादी संघटना असेही म्हटले नाही. यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 25 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले तेव्हा पाकिस्तान आणि चीनच्या आक्षेपानंतर निवेदनातून टीआरएफ आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख काढून टाकण्यात आला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article