महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोन्यासाठी महिलाच उठली महिलेच्या जिवावर

11:55 AM Nov 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खून करून चक्क मृतदेह फेकला होता जंगलात : कॅसलरॉक लक्ष्मीवाडा येथील घटना

Advertisement

रामनगर  / वार्ताहर

Advertisement

जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक लक्ष्मीवाडा येथे 18 नोव्हेंबर रोजी अज्ञात महिला जखमी अवस्थेत रस्त्यापासून काही अंतरावर झुडपामध्ये सापडली होती. त्यामुळे कॅसलरॉक गावातील काही नागरिकांनी 108 ऊग्णवाहिकेला कळवून रुग्णवाहिकेमधून महिलेला रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये आणले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जखमी महिलेने ऊग्णवाहिकेत घालताना आपण रामनगर येथील असल्याचे सांगितले होते. परंतु तिच्या तोंडाला, डोक्यात मारहाण केल्याने तिचा चेहरा ओळखणेही मुश्कील झाल्याने रामनगर पोलिसांनी याबाबत तपास जारी ठेवला होती.

सदर महिला रामनगर पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असणाऱ्या आंबेडकर भवननजीक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिलेचे नाव शाहीजहान उस्मान शेख (वय 70) असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला एकटीच येथील घरात राहत होती. तिला कोणी व कशासाठी मारण्यात आले याचा तपास रामनगर पोलिसांनी चालूच ठेवला होता. तपासादरम्यान खून झालेल्या महिलेच्या घराजवळीलच महिलेने सोन्यासाठी तिला मारल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत जोयडा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर हरिहर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या घराजवळच प्रमिला प्रकाश मराठे (वय 52) नामक महिला रहात असून ती कर्जामध्ये पूर्णपणे बुडाल्याने तिने शाहीजहान या महिलेला मारून तिचे सोने काढून घेण्याचा कट रचला होता. त्यामुळे आरोपी प्रमिला हिने शाही शेख हिला मूळव्याधीचा त्रास असल्याने दि. 16 नोव्हेंबर रोजी खानापूर येथील डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन जातो असे सांगून खानापूर येथे बसने नेले. खानापूरला डॉक्टर उपलब्ध नसून गावठी औषध अनमोड कॅसलरॉक येथे मिळत असून खानापूर येथून हेम्माडगामार्गे बसने अनमोडला आणले व अनमोड येथून कॅसलरॉक येथे नेऊन चालत जाताना वर्दळ नसलेल्या स्थळी नेऊन तिच्यावर मागून वार केला व ती मृत झाल्याचे समजून तिच्या गळ्यातील चेन तसेच दोन बांगड्या घेऊन तिला जंगलात टाकले. त्यानंतर कॅसलरॉक येथील आपल्या नातलगाकडे गेली व तेथून रात्री रामनगर येथील आपल्या मुलाला आपण कॅसलरॉक येथे असून आपल्याला घेऊन जाण्यास येण्यासाठी तिने फोन केला. तिचा मुलगा देवदर्शनासाठी गेल्याने रात्री उशिरा येऊन सदर आरोपी महिला प्रमिलाला रामनगर येथे आणले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रमिला हिने हिसकावून घेतलेले सोने खानापूर येथील एका खासगी बँकेत ठेवून त्याची रक्कम रामनगर येथील आपल्या बँकेच्या खात्यात जमा केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर कारवाईत जोयडा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर हरिहर, रामनगर पोलीस स्थानकाचे क्राईम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पाटील, कर्मचारी मंजुनाथ चौरद, तनुज नाईक, मल्लिकार्जुन हसमणी आदींनी सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article