महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन आठवड्यांसाठी फुटबॉल सराव शिबिर

06:09 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2024 च्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनने दोन आठवड्यांच्या कालावधीकरिता सराव शिबिर आयोजित केले आहे. आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 13 जानेवारीपासून खेळविली जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाकरिता चार आठवड्यांचे सराव शिबिर घेण्याचे ठरविले होते. पण आता सदर शिबिर दोन आठवड्याचे घेण्याचा निर्णय झाला आहे. या सराव शिबिरावेळी प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांचे संघातील फुटबॉलपटूंना बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. दरम्यान इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला याच कालावधीत प्रारंभ होत आहे. त्यामुळे वेळापत्रक समितीची कोंडी झाली आहे.

Advertisement

2026 साली होणाऱ्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरीमध्ये भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. गेल्या गुरुवारी झालेल्या 2026 च्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरीतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारताने कुवेतचा 1-0 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article