For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटबॉल लढत बरोबरीत

06:33 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
फुटबॉल लढत बरोबरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

येथे शुक्रवारी झालेल्या फ्रेंच लीग फुटबॉल स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) आणि मोनॅको यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पीएसजीने आघाडीचे स्थान मिळविताना नजिकच्या संघावर 12 गुणांची आघाडी मिळविली आहे.

या सामन्यात फ्रान्सचा हुकमी स्ट्राईकर एम्बापे पूर्वार्धात गोल करु शकला नाही. मध्यंतरानंतर एम्बापेला विश्रांती देण्यात आली होती. एम्बापेचा या स्पर्धेतील सलग दुसरा सामना आहे. पीएसजीचा या स्पर्धेतील हा 19 वा सामना असून त्यांनी आतापर्यंत एकही पराभव पत्करलेला नाही. आता हा संघ तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.