महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भुयाऱ्यात अडकलेल्यांना आता नव्या पाईपमधून अन्नपुरवठा

06:50 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ढिगाऱ्यातून 6 इंच रुंद पाईप टाकण्याचे काम पूर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

Advertisement

उत्तराखंडमधील कोसळलेल्या बोगद्याच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी सोमवारी सहा इंच रुंददीची पाईपलाईन घातल्यामुळे आठ दिवसांपासून अडकलेल्या 41 कामगारांना मोठ्या प्रमाणात अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता नव्या पाईपलाईनमधून अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

उत्तरकाशी जिह्यातील सिलक्यारा गावात बांधकामाधीन बोगद्याचा एक भाग 12 नोव्हेंबर रोजी भूस्खलनामुळे कोसळल्यापासून 41 कामगार अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.  यापूर्वी ढिगाऱ्याच्या पलीकडे असलेल्या बोगद्याच्या विभागात ड्रायफ्रूट आणि औषधे आणि ऑक्सिजन आदींचा पुरवठा चार इंची पाईपमधून केला जात होता. आता नवीन पाईपलाईनमुळे रोटी आणि भाजीसारखे खाद्यपदार्थ कामगारांना पाठवता येतील.

सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी परदेशी तज्ञांची मदत घेतली जात आहे. शनिवारी अभियांत्रिकी तज्ञ अरमांडो पॅपेलन आणि मायक्रोटनेलिंग तज्ञ ख्रिस कूपर देखील बचावकार्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. आता हॉलंडमधून मागविण्यात आलेली ड्रिलिंग मशीनही घनटास्थळी दाखल झाली असून नवा बचावमार्ग खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

भुयारामध्ये अडकलेल्या सर्व मजुरांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सध्या केंद्र आणि राज्यातील एकूण सहा पथके काम करत आहेत. पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव मंगेश घिलडियाल, माजी सल्लागार भास्कर खुल्बे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद आणि भूगर्भशास्त्रज्ञ वऊण अधिकारी आदी वरिष्ठ मंडळी घटनास्थळी प्रत्यक्ष नजर ठेवून आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article