For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केक तपासणीकडे 'अन्न व औषध'चे दुर्लक्ष

11:36 AM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
केक तपासणीकडे  अन्न व औषध चे दुर्लक्ष
Food and Drug Administration's neglect of cake inspection
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शहर आणि परिसरासह जिल्ह्यातील बाजारपेठ नाताळ व थर्टींफर्स्टसाठीच्या केकने सजली आहे. शहरातील केकची विक्री अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व अधिनियम 2011 नियमानुसार सुरू नसल्याचे दिसत आहे. केकच्या विषबाधेमुळे कागल तालुक्यातील चिमगाव येथील दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विषबाधेचा अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहे. असे असून देखील अन्न व औषध विभाग अजूनही ‘सुस्त’ असल्याने, केकबाबत आता लोकाकडूनच सावधनतेची गरज आहे.

25 तारखेला नाताळ व 31 रोजी थर्टींफर्स्ट आहे. तसेच अनेकांचे वाढदिवस व विवाहांचे सेलीब्रेटी ं असल्याने, बेकरी व केक शॉपीमधून केकची मागणी वाढत आहे. केक विक्रीबाबत कोल्हापूरच्या अन्न व औषध विभागाकडून अजूनही खबरदारी घेतलेली दिसत नाही. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व अधिनियम 2011 च्या नियमाकडे दुर्लक्ष करूनच केक विक्री सुरू आहे.

Advertisement

ज्या काचेच्या शो केसमध्ये केक ठेवला जातो, त्dया केकसमोर त्याचे उत्पादन व एक्स्पायरीचे लेबल लावणे आवश्यक आहे. पण शहरातील अनेक केक शो केसमधून याची माहीती लावलेली दिसत नाही. हा केक एगलेस की एगचा आहे, याचे हिरवा वा लाल चिन्ह असणे आवश्यक आहे. केकची एक्स्पायरी 24 तास इतकीच असल्याने, या लेबलकडे अजूनही अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. तसेच हा केक उने दोन टेंपरेचरमध्ये ठेवणे आवश्यक असताना, ही सोय कोणत्याच केकबाबत केलेले नाही हे स्पष्ट होत आहे.

केक विक्रीबाबत अन्न व औषध विभागाकडून अजूनही निष्काळजीपणा दाखवला जात आहे. कारण केकसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रिम,सॉस व शुगर टॅपिंग क्रिम ही मुदतबाहय असल्याची चचर् आहे. यातूनच केक हा खाण्यास अयोग्य होत असतो. केकवर नाव लिहीण्यासाठी वापरण्यात येणारा शुगर टॉपिंग क्रिम ही कालबाहय असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या वाहनातून केकची वा खाद्यपदार्थाची डिलिव्हरी दिली जाते, त्या वाहनासाठी अन्न व औषध विभागाचा परवाना असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. पण शहरातील अनेक व्यावसायिकाकडून खाद्यपदार्थाची डिलिव्हरी रिक्षा वा दुचाकीवरून उघडयावर केली जात आहे. केकची विक्री अन्न सुरक्षा मानके कायद्याविरोधी सुरू असल्याचे दिसत आहे.

भारतात 1954 पासून अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 2011 पर्यंत लागू होता यानंतर 1970 मध्ये या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली. 5 ऑगष्ट 2011 नंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व अधिनियम 2011 हा कायदा अस्तित्वात आला. या व्यतिरिक्त अन्नपदार्थं नियंत्रण अॅगमार्क बीआयएस भारतीय दंड संहीता (कलम 272 ,273 ) हे कायदे अंमलीत आले आहेत. हा कायदा आता तरी कागदावरच असल्याचे दिसत आहे.

                                               फॉरेन्सिक लँबच्या अहवालाची प्रतीक्षा 

चिमगाव येथील केकमुळे झालेली विषबाधा याचा कोणताही अहवाल अजून आलेला नाही. हा प्रकार मुरगुड पोलीस स्टेशनच्या अख्dयात्dयारीत आहे. या विषबाधेचा फॉरेन्सिक लँबचा अहवाल मुरगुड पोलिस स्टेशनकडून अजून प्राप्त झालेला नाही. तसेच अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल आलेला नाही. या केकबाबत उत्पादकाकडून उपलब्ध असलेल्या कप केक हा या बॅचमधुन सॅम्पल घेण्यात आला आहे. हे सॅम्पल खालेल्या केकचा नाही. या केकचे सॅम्पल अन्न व औषध प्रशासनाने लँबकडे पाठवले आहे. याचा अहवाल तसेच फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजूनही आलेला नाही.

                                                         प्रदीपा फावडे .सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर विभाग

Advertisement
Tags :

.