For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंडा शारीरिक शिक्षकांसाठी क्रीडा मानसशास्त्र विषयावर कार्यशाळा

12:13 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोंडा शारीरिक शिक्षकांसाठी क्रीडा मानसशास्त्र विषयावर कार्यशाळा
Advertisement

फोंडा : गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय व सुख समृद्धी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडा तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी क्रीडा मानसशास्त्र याविषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात 55 शारीरिक शिक्षकांनी भाग घेतला. फोंडा तालुका मिनी व सेकंडरी स्कूल क्रीडा मेळाव्याच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकी दरम्यान ही कार्यशाळा घेण्यात आली. पुणे येथील समीक्षा स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या क्रीडा मानसशास्त्रज्ञ मृण्मयी फाटक या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या खेळाकडे एक छंद व व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जात होते. आज खेळात कारकीर्द घडविता येते. खेळाडूंना मदत करण्यासाठी कार्यक्षम व नावीन्यपूर्ण प्रणाली तयार करणे आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण व वैद्यकीय साहाय्यतेबरोबरच क्रीडा मानसशास्त्र हा एक महत्वाचा घटक बनला आहे. शालेय तसेच व्यावसायिक खेळाडूंना  क्रीडा जगतात तीव्र स्पर्धा असल्याने त्यांच्यावर दबाव असतो. यामुळे त्यांच्यात शारीरिक, मानसिक व भावनिक कमतरता होऊ शकते. अशावेळी क्रीडा मानसशास्त्रज्ञाची गरज लागते. त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास ते मदत करतात असे मृण्मयी फाटक या म्हणाल्या. यावेळी सुख समृद्धी फाऊंडेशनचे संचालक राजेंद्र किर्लोस्कर, फोंड्याचे एपीईओ पांडुरंग नाईक, फोंडा तालुका मिनी व सेकंडरी स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझींग समितीचे अध्यक्ष बेंजामीन रोचा, टीएसओ शैलेश गांवकर व विविध हायस्कूल्सचे मुख्याध्यापक उपस्थित होते. स्वागत पांडुरंग नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिस्का पिरीस यांनी केले. शैलेश गांवकर यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.