For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंडा पालिका पुरविणार दहा रूपयात कापडी पिशव्या

01:07 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोंडा पालिका पुरविणार दहा रूपयात कापडी पिशव्या
Advertisement

प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी पालिकेचा उपक्रम, शहरात वेगवेगळ्या 4 ठिकाणी बसविणार वेंडिंग मशिन 

Advertisement

फोंडा : फोंडा पालिका क्षेत्रातील वाढत्या प्लास्टिक कचऱ्यावर उपाय शोधताना  पालिकेने पर्यावरणप्रेमी नामी शक्कल लढविली आहे. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी शहरात चार ठिकाणी दहा रूपयात कापडी पिशव्या उपलब्ध करणारे वेंडिंग मशिन बसविले जाणार आहे. येत्या दिवसात फोंडा शहरात ही मशीने बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून खरेदीसाठी घरातून कापडी पिशवी विसरून आल्यानंतर प्लास्टिक पिशवीवर अवलंबून रहावे लागणार नाही. तिस्क उसगांव येथील एमआरएफ कंपनीच्या सामाजिक उपक्रम योजनेअंतर्गत ही मशिने फोंडा पालिकेला उपलब्ध करण्यात आलेली आहेत. मशीनमध्ये दहा रूपयांचे नाणे घातल्यानंतर एक कापडी पिशवी बाहेर येणार आहे.

मुख्य म्हणजे फोंड्यातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण गोवा बागायतदार येथेही एक मशिन बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली. वेंडिंग मशिनमध्ये कापडी पिशव्याचा मुबलक साठा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर रिफ्ढिल करणे व मशिनच्या देखभालीची जबाबदारी फोंडा पालिका कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली होणार आहे. आता पालिकेकडून  पालिका क्षेत्रात प्लास्टीकचा वापर करणाऱ्याविरोधात कडक मोहीम उघडण्यात येणार आहे. सरकारने घालून दिलेल्या अटीनुसार 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या  प्लास्टीक पिशवी वापरल्यास सुमारे 5000 ऊपये दंड आकारण्यात येणार आहे.

Advertisement

गोल्डन ज्युबिलीला चालना, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटला

फोंडा पालिकेचा रखडलेला गोल्डन ज्युबिली प्रकल्पालाही येत्या दिवसात चालना मिळणार आहे. यासंबंधी उर्वरीत कामासाठी  सुमारे अडीच कोटी रूपयांचा निधी जीसुडाअंतर्गत उपलब्ध करण्यात येणार आहे. दि. 1 जुलै रोजी यासंबंधी निविदा काढणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली. तसेच भटक्या गुरांचा प्रश्न गोशाळेच्या उभारणीने सुटलेला आहे. या शेडमध्ये भटक्या कुत्र्याचे निर्बिजीकरण, लसीकरण तसेच उपचार करण्याची सोय असेल. पालिका बैठकीत चर्चा केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे रितेश नाईक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.