महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंडा पालिकेतर्फे रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यास प्रारंभ

12:33 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोंडा : फोंडा पालिका क्षेत्रातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी बेवारस स्थितीतील वाहनांविरोधात फोंडा पालिकेतर्फे कारवाईला काल गुरूवारी सकाळपासून प्रारंभ झाला.क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावर रूतलेली वाहने उचलून टोईग क्रेन वाहनाने पालिकेच्या भंगारअड्ड्याच्या जागेत ठेवण्यात आली. फोंडा वाहतूक पोलिसांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तिस्क-फोंडा येथील बेवारस स्थितीतील कारगाडी हलविण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. शहर परिसरात बेवारस स्थितीत असलेल्या सुमारे 22 वाहनांना नोटिसी चिकटविण्यात आल्या होत्या. वाहनमालकांनी दिलेली 7 दिवसांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्याच स्थितीत असलेली वाहने पालिकतर्फे हटविण्याचे सोपकर पूर्ण करण्यात येत आहेत. फोंडा पालिका मंडळातर्फे मार्च महिन्याच्या बैठकीत बेवारस स्थितीतील वाहने हटविण्याबाबत ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटविल्याशिवाय पार्किग व्यवस्था सुरळित होणार नाही. हटविण्यात आलेली वाहने पालिकेच्या जागेत ठेवण्यात येणार असून त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पुर्ण करून लिलावाद्वारे भंगारात काढण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article