महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंडा शहरावर वर्षभरात चढणार सौंदर्याचा साज

12:16 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नगराध्यक्ष रितेश नाईक यांची घोषणा : वाढदिनी जनतेला दोन प्रकल्पांची भेट

Advertisement

फोंडा : फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांनी आपल्या वाढदिनाचे औचित्य साधून शांतीनगर फोंडा येथे पथपूलवजा सुशोभीत पदपथ तसेच सांताकूझ तिस्क फोंडा येथे बालोद्यानाचे उद्घाटन केले. हे दोन्ही प्रकल्प जनतेच्या सेवेसाठी खुले कऊन त्यांनी आपल्या वाढदिनाचे रिटर्न गिफ्ट फोंडावासियांना दिले आहे. फोंडा पालिका क्षेत्राच्या विकासपर्वाची ही सुऊवात असून येत्या वर्षभरात फोंडा शहरावर उद्यानांसह सौदर्यीकरणाचा साज चढणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. काल रविवार 24 रोजी वाढदिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी या दोन्ही विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. शांतीनगर प्रभाग 1 मध्ये शांतीनगर व कुरतरकरनगरीला जोडणारा पदपूल व सुशोभीत केलेल्या पदपाथाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले. पूर्वी याठिकाणी एक छोटीशी अडगळीची पायवाट होती. शांतीनगर येथून पलिकडे कुरतरकनगरीत हायस्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी  तसेच अन्य नागरिकांना नाला ओलांडताना कसरत करावी लागत होती. नागरिकांची ही समस्या कायमची निकाली काढताना अंदाजे ऊ. 17 लाख 50 हजार खर्चून नाल्यावर पदपूल व त्याला जोडून पदपथ तयार करण्यात आले आहे. पुलाच्या एका बाजूला बालोद्यानाचे कामही हाती घेण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नाईक, ऊपक देसाई, पालिका मुख्याधिकारी शुभम नाईक, अभियंते विशांत नाईक, ज्येष्ठ नागरिक अवधूत भांडारी व अन्य नागरिक उपस्थित होते. अगदी कमी वेळेत उत्कृष्ट असे पदपथवजा पदपूल उभारल्याबद्दल अवधूत भांडारी यांनी फोंडा पालिका व रितेश नाईक यांचे अभिनंदन केले.

Advertisement

सांताक्रूझ तिस्क फोंडा येथे आयडी इस्पितळाजवळ उभारण्यात आलेल्या ज्युलियो सेड्रिक आगियार स्मृती बालोद्यानाचेही रितेश नाईक यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरील मान्यवरांसह जुलियो आगियार यांचे बंधू अॅङ मेल्विन आगियार हे उपस्थित होते. अॅड. मेल्विन यांनी आपले बंधू जुलियो हे पर्यावरणप्रेमी होते व सेव्ह मोलेसह अन्य पर्यावरणीय आंदोनलनात ते सक्रीय असल्याचे सांगितले. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या बालोद्यानात तसेच शहरातील मोकळ्या जागांमध्ये अधिकाधिक झाडे लावून फोंडा शहराचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची मागणी केली. रितेश नाईक यांनी फोंडा पालिकेच्या बहुतेक प्रभागांमध्ये बालोद्याने व सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. फोंडा पालिकेला लागूनच प्रशस्त असे बहुउद्देशीय उद्यान मंत्री रवी नाईक यांच्या आमदार निधीतून साकारले जाणार आहे. राज्य सरकार तसेच विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी कचरा व्यवस्थापन, गोशाळा, स्मशानभूमीचे नूतनीकरण तसेच सौंदर्यीकरणावर खर्च करण्यात आला आहे. याशिवाय पालिकेला महसूल देणाऱ्या काही नवीन व्यावसायिक प्रकल्पांच्या कामालाही चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article