For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करा

11:29 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
उच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करा
Advertisement

तळवार महासभा जिल्हा शाखेचा मोर्चा : निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : तळवार समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन करण्याची मागणी कर्नाटक राज्य तळवार महासभा बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे. यासंबंधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे. तळवार समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत करण्यात आला आहे. मागासवर्गीयांच्या यादीतून तळवार वगळून अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानेही तळवार समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्यासंबंधी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या निर्णयाविरुद्ध काही जणांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तळवार समाजावर परिणाम होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.