कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऊसतोडणी पैशाच्या वादातून लोकगीत गायकाचा खून

11:32 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रायबागजवळ कार उलटवून संपविले : अन्य एक जखमी : दोघांना अटक, एकूण अकरा जणांविऊद्ध एफआयआर

Advertisement

बेळगाव : ऊसतोडणीसाठी येण्याचे सांगून 5 हजार रुपये अॅडव्हान्स घेतल्यावरून रायबाग तालुक्यातील एका लोकगीत गायकाचा भीषण खून करण्यात आला आहे. त्याच्या खुनानंतर बुदिहाळ, ता. रायबागजवळ कार उलटवून अपघात भासविण्यात आला असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात सोबत असलेला मारूती घंटीही जखमी झाला आहे. मारुती आडव्याप्पा लठ्ठे (वय 22) असे खून झालेल्या लोकगीत गायकाचे नाव आहे. रॉड व तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला आहे. गुरुवार दि. 10 जुलै रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणी रायबाग पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून एकूण 11 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

कुमार आडव्याप्पा लठ्ठे, राहणार बुदिहाळ यांनी फिर्याद दिली आहे. इराप्पा वसंत अकिवाटे, सिद्धराम सिद्धाप्पा वडेयर, आकाश ऊर्फ अक्षय कट्याप्पा पुजेरी, राहणार जाडट्टी, हालप्पा ऊर्फ अजित वसंत अकिवाटे, मारुती वसंत अकिवाटे, वसंत हालाप्पा अकिवाटे, रामा हालाप्पा अकिवाटे, विजय रामा अकिवाटे, विठ्ठल रामा अकिवाटे, मल्लाप्पा हालाप्पा अकिवाटे, हालाप्पा मल्लाप्पा अकिवाटे सर्व राहणार बुदिहाळ, देवनहट्टी व जोडट्टी यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे.

पोलिसांनी सिद्धराम वडेयर व आकाश पुजेरी या दोघा जणांना अटक केली आहे. उपलब्ध माहितीनुसार इराप्पा अकिवाटे याच्याकडून ऊसतोडणीसाठी येण्याचे सांगून मारुती लठ्ठे याने 50 हजार रुपये घेतले होते. प्रत्यक्षात तो ऊसतोडीसाठी गेला नाही. 45 हजार रुपये परत केले व 5 हजार रुपये द्यायचे होते. याच कारणावरून ही घटना घडली आहे. 10 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता मारुती लठ्ठे व मारुती घंटी हे दोघे जण केए 23 ईटी 2383 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून देवनकट्टी-बुदिहाळ रोडवरून जाताना मोटरसायकल अडवून हल्ला केला. केए 51 एमजे 2008 क्रमांकाच्या कारने धडक दिली. मारुतीच्या खुनानंतर अपघात भासवण्यासाठी कार उलटवण्यात आली आहे. अथणीचे उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रायबाग पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article