महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्यापारासोबतच संसाधनांवर लक्ष केंद्रित करा!

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे ‘बिम्सटेक’ सदस्य देशांना आवाहन : शिखर संमेलनाचे आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुऊवारी सात देशांच्या ‘बिम्सटेक’ संघटनेला बंगालच्या उपसागरातील देशांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन ऊर्जा आणि अधिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. नवी दिल्लीत आयोजित परराष्ट्र मंत्र्यांच्या ‘बिम्सटेक’ रिट्रीटमध्ये बोलताना जयशंकर यांनी व्यापार क्षमता वाढवणे आणि आर्थिक सहकार्य यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यावरही भर दिला. त्यांनी कनेक्टिव्हिटी, संस्था निर्माण, व्यापार, आरोग्य, व्यवसाय, अंतराळ सहकार्य, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्षमता निर्माण आणि सामाजिक देवाणघेवाण यासारख्या सामायिक हितांवरही विशेष लक्ष देण्याची सूचना केली.

‘बिम्सटेक’ ही बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या देशांची संघटना आहे. त्यात सात देशांचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त सात देशांच्या या गटात श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान यांचा समावेश आहे. या परिषदेत सागरी वाहतूक सहकार्यावरील करारावर शिक्कामोर्तब होणार असून त्यामुळे सदस्य देशांमधील व्यापाराला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित ही परिषद दोन दिवस चालणार आहे. ‘बिम्सटेक’च्या दुसऱ्या बैठकीला सर्व देशांचे परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव उपस्थित आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ‘बिम्सटेक’ सदस्य देशांच्या समकक्षांचे यजमानपद भूषवत आहेत. या परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्री आणि शिष्टमंडळांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार आहेत. पुढील बिमस्टेक शिखर परिषद यावषी थायलंडमध्ये होणार आहे. याआधी, परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक 17 जुलै 2023 रोजी थायलंडची राजधानी बँकॉक येथे झाली होती.

नेबरहुड फर्स्ट, अॅक्ट ईस्ट पॉलिसी

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य, ‘बिम्सटेक’वर बंगालच्या उपसागराच्या पुढाकारासह भारताचे धोरणात्मक महत्त्व स्पष्ट केले. नेबरहुड फर्स्ट, अॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि सागर व्हिजन यासारख्या व्यापक जागतिक मुद्यांसंदर्भात त्यांनी देशाचे महत्त्व अधोरेखित केले. बंगालच्या उपसागरावर विशेष लक्ष केंद्रित करून ह्या योजनांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article