100 वर्षांनी फुलले लिपस्टिकचे फुल
1912 लागला होता शोध
भारतीय वनस्पती सर्वेक्षणाच्या (बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया) संशोधकाहंनी 100 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम अंजॉ जिल्ह्य़ात एका दुर्लभ रोपाचा शोध लावला आहे. या रोपाला कधीकाळी ‘भारतीय लिपस्टिक रोप’ म्हटले जात होते. वैज्ञानिकांच्या भाषेत याला एस्क्नॅन्थस मोनेटेरिया डन म्हटले जाते.
या रोपाची ओळख पहिल्यांदाच ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ स्टीफन ट्रॉयट डन यांनी 1912 मध्ये पटविली होती. हा शोध एक अन्य वनस्पतीशास्त्रज्ञ इसहाक हेन्री बर्किल यांच्याकडून अरुणाचल प्रदेशातून जमा करण्यात आलेल्या रोपांच्या नमुन्यांच्या आधारावर करण्यात लागला होता.
टय़ुबलर रेड कोरोलाच्या उपस्थितीमुळे जीनस एशिनॅन्थस अंतर्गत काही प्रजातींना लिपस्टिक प्लांट म्हटले जाते अशी माहिती बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे वनस्पतीशास्त्रज्ञ कृष्णा चौलू यांनी दिली आहे. अरुणाचल प्रदेशात फुलांच्या अध्ययनादरम्यान चौलू यांनी डिसेंबर महिन्यात अंजॉ जिल्ह्य़ाच्या ह्युलियांग आणि चिपरूमधून एशिन्थसचे काही नमुने जमा केले होते. हे एशिन्थस मोनेटेरियाचे नमुने 1912 मध्ये बर्किलनंतर भारतातून कधीच प्राप्त झाले होते असे जुन्या दस्तऐवजांच्या अध्ययनानंतर स्पष्ट झाले. हे रोप दमट आणि सदाहरित जंगलांमध्ये 543 ते 1134 मीटर उंचीच्या क्षेत्रात उगवते. याचे फूल ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान फुलत असते. जीनस नाव ऐशिनंन्थस ग्रीक ऐशाइन किंवा ऐस्किनमधून प्राप्त झाले आहे. याचा अर्थ संकोच वाटणे असा होतो. तर एंथोसचा अर्थ फूल आहे. मोनेटेरियाचा अर्थ ‘पुदीनासारखा’ असा होतो.