For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘थंडरबोल्ट्स 2’मध्ये फ्लोरेन्स प्यू

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘थंडरबोल्ट्स 2’मध्ये फ्लोरेन्स प्यू
Advertisement

मार्व्हल स्टुडिओजचा चित्रपट

Advertisement

हॉलिवूड अभिनेत्री फ्लोरेन्स प्यू मार्वलच्या सेटवर परतली आहे. अभिनेत्रीने अलिकडेच अटलांटा सेटवरील पडद्यामागील झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. फ्लोरेन्स सध्या स्वत:चा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थंडरबोल्ट्स’चे चित्रिकरण करत आहे. फ्लोरेनस यात किलर येलेना बेलोवाच्या स्वरुपात पुनरागमन करत आहे. ही भूमिका तिने पहिल्यांदा ‘ब्लॅक विडो’मध्ये साकारली होती आणि ‘हॉकआय’मध्ये या भूमिकेत ती दिसून आली होती.  फ्लोरेन्सने सेटवरील व्हिडिओ शेअर केला असून यात येलेनाची झलक दिसून येत आहे. यात ती एका आकर्षक वॉरसूटमध्ये दिसून येत आहे. व्हिडिओत तिने चित्रपटाचे दिग्दर्शक जॅक श्रेयर यांचीही भेट घडवून आणली आहे. यानंतर फ्लोरेन्स स्वत:चा कॅमेरा एका प्लेबॅक मॉनिटरवर केंद्रीत केला आणि येलेना बेलोवाचा पहिला अधिकृत लुक जारी केला आहे. स्क्रीनवर येलेना अॅक्शनसाठी तयार आणि सशस्त्र होती. मार्व्हलच्या थंडरबोल्टस चित्रपटाने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले आहे. आता मार्व्हल सिनमॅटिक युनिव्हर्सचा ‘थंडरबोल्टस 2’ हा चित्रपट 2 मे 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.