For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर प्रदेशात महापूर; 350 गावे पाण्याखाली

06:06 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तर प्रदेशात महापूर  350 गावे पाण्याखाली
Advertisement

22 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लखीमपूर खेरीला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील 5 तालुक्मयांतील 350 गावात पाणी शिरले आहे. त्याचवेळी ललितपूरमध्ये पावसामुळे गोविंदसागर धरणाचे आणखी 4 दरवाजे उघडावे लागले. आधीच 16 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता.

Advertisement

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला. रविवारीही येथे संततधार पर्जन्यवृष्टी सुरू होती. उत्तराखंडमधील नई टिहरी येथे भूस्खलनात आई आणि मुलीचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील एका गावात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.

हवामान खात्याने 22 राज्यांमध्ये संततधार पाऊस कोसळू शकतो असे म्हटले आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, अऊणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, अऊणाचल प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू या राज्यांच्या काही भागात रिमझिम पाऊस, वादळ आणि विजांचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हिमाचलमध्ये आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये मान्सूनच्या सुऊवातीपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून राज्याचे आतापर्यंत 410 कोटी ऊपयांचे नुकसान झाले आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या म्हणण्यानुसार, 21 जणांचा उंचावरून पडल्यामुळे तर 18 जणांचा बुडून मृत्यू झाला. तसेच 8 जणांचा सर्पदंशामुळे, 8 जणांचा विजेचा धक्का लागल्याने आणि एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. भूस्खलन किंवा ढगफुटीमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.

Advertisement
Tags :

.