पुराची भिती नसली तरी शिरोलीकरांकडून खबरदारी! प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून
पुलाची शिरोली / वार्ताहर
पावसाने उघडीप दिल्याने शिरोली गावात सध्यातरी पुराच्या पाण्याची भिती मागील महापुरासारखी नाही. पण खबरदारीचा उपाय व मनुष्य आणि वित्त हानी होवू नये म्हणून सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, लोक प्रतिनिधी योग्य ती खबरदारी घेत आहेत .
पुलाची शिरोलीत सिक्सर कॉलनी, चौगले मळा, सर्जेखान गल्ली,देसाई मळा, चव्हाण मळा, जय भवानी तालीम परिसर आदी ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावेळी महसूल विभागाचे अधिकारी स्थलांतर कुटुंबाच्या घरांची माहिती घेतली. तसेच विज वितरण अधिकारी व कर्मचार्यानी पंचगंगा पुराचे पाणी शिरलेल्या घरातील विद्युत पुरवठा बंद केला. तसेच स्थलांतर कुटुंब व नागरीकांची माहिती संकलीत करण्याचे काम कोतवाल संदीप पुजारी, दादाभाई देसाई यांनी केले. शनिवार दुपार पर्यंत ३२ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच जनावरांना कन्या शाळेच्या पटांगणात बांधण्यात आले आहे.
येथील पुरबाधीत ठिकाणची पहाणी व नागरिकांना सुचना देण्यासाठी सर्वच शासकीय अधिकारी पहाटे पासून सेवेत. गावकामगार तलाठी नागेश तोंडरुड, अभिषेक पतंगे, विज वितरण अभियंता श्रेयस कुसाळे, प्रधान तंत्रज्ञ अशोक कोळी या प्रशासन अधिकार्यांनी शनिवारी पहाटे पासून गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली. तस शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी हे महामार्गावरील पुरस्थितीचा अंदाज घेवून वाहतूक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.