For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूरस्थिती निवारण्यासाठी पूर्वतयारी करण्याची सूचना

11:09 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूरस्थिती निवारण्यासाठी पूर्वतयारी करण्याची सूचना
Advertisement

जि. पं. सीईओ राहुल शिंदे : उचगाव मार्कंडेय नदीच्या पुलाची पाहणी

Advertisement

बेळगाव : मार्कंडेय नदीच्या व्याप्तीत येणाऱ्या हिंडलगा, सुळगा, उचगाव आणि आंबेवाडी ग्राम पंचायतीतील व्याप्तीत पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागाची सीईओ राहुल शिंदे यांनी पाहणी केली. पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. हिंडलगा आणि आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या मार्कंडेय नदीवरील पुलाची पाहणी करून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावर्षी हवामान खात्याकडून पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण अधिक झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊन अतिवृष्टी होण्याची अधिक शक्यता आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणांचा शोध घ्यावा. अतिवृष्टीमुळे नुकसान होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी आतापासूनच उपाययोजना राबविण्यासाठी तयारी करण्यात यावी. काही ठिकाणी नागरिकांचा संपर्क तुटण्याची शक्यता असते. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावांना धोका निर्माण होण्याची व गावे बुडण्याचा धोका आहे.

अशा गावातील नागरिकांना योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. भूस्खलन होऊन रस्ते खचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी लक्ष देण्यात यावे. पूरस्थिती निर्माण होऊन संपर्क बंद होणाऱ्या ठिकाणांचाही शोध घेण्यात यावा. अशा ठिकाणांची नोंद घेऊन मदत केंद्रे स्थापन्याची नोंद करून घेण्यात यावी. संकट काळात मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या बचावपथक तसेच स्वयंसेवक पथकांची यादी तयार करावी. यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर, ता. पं. कार्यकारी अधिकारी रामरे•ाr पाटील, पंचायत राज खात्याचे उपविभाग कार्यकारी अभियंता एस. बी. कोळीगु•, पाणीपुरवठा आणि नैर्माल्य खात्याचे कार्यकारी अभियंता एस. के. पाटील, बागायत खात्याचे उपसंचालक प्रवीण महिंद्रकर, ता. पं. साहाय्यक संचालक बी. डी. कडेमनी, गणेश के. एस., ता. पं. व्यवस्थापक राजेंद्र मोरबद आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.