महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बळ्ळारी नाल्याला महापुराचे स्वरूप

10:47 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुने बेळगाव, वडगाव, अनगोळ शिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Advertisement

वार्ताहर/धामणे

Advertisement

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला महापुराचे स्वरुप आले आहे. त्यामुळे जुने बेळगाव, वडगाव, अनगोळ, शहापूर येथील शेतकऱ्यांच्या शिवारात बळ्ळारी नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. अनेक वर्षापासून या बळ्ळारी नाल्याचा प्रश्न उपस्थित आहे. जुने बेळगाव, वडगाव, शहापूर, अनगोळ येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे बळ्ळारी नाल्याबद्दल अनेकवेळा निवेदन दिली आहेत. शिष्टमंडळे अनेक मंत्र्यांच्या भेटी घेवून या बळ्ळारी नाल्याच्या पाण्यामुळे प्रत्येक वर्षी शेकडो एकर जमिनीतील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती दिल्यानंतर शासनाकडून याबद्दल पाहणी करून जातात आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिले जाते. पावसाळा संपला की या नाल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी या समस्येकडे फिरकून बघत नाहीत. याबद्दल आम्ही वैतागून गेलो आहोत, असे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांनी या समस्येकडे जातीने लक्ष देण्याची मागणी

निदान पालकमंत्र्यांनी तरी या बळ्ळारी नाल्याच्या समस्येकडे जातीने लक्ष पुरवून आता सध्या नाल्याला आलेल्या पुराची पाहणी करावी. तसेच पावसाळ्यानंतर या नाल्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून आता जोर धरु लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article