महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘फेंगल’मुळे पुद्दुचेरीत पूरसदृश परिस्थिती

06:29 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Puducherry, Dec 01 (ANI): Indian Army conduct flood relief operations following heavy rainfall caused by Cyclone Fengal, in Puducherry on Sunday. (ANI Photo)
Advertisement

चेन्नई शहरही जलमय : वादळाचा दणका, मुसळधार पर्जन्यवृष्टी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

बंगालच्या उपसागरातून 25 नोव्हेंबर रोजी उगम पावलेले फेंगल चक्रीवादळ 30 नोव्हेंबर रोजी रात्री 7:30 वाजता पुद्दुचेरीमधील कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर रात्रभर या वादळाचा प्रभाव आणि पुढील वाटचाल सुरू होती. वादळाच्या काळात मुसळधार पाऊस आणि ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातही या वादळाचा प्रभाव दिसून आला. मात्र, प्रामुख्याने पुद्दुचेरी आणि चेन्नई शहरातील अनेक भाग पुराच्या विळख्यात अडकलेले दिसून आले.

30 नोव्हेंबरला लँडफॉल झाल्यानंतर फेंगल वादळ तामिळनाडूसह आजूबाजूच्या परिसरात अडकले आहे. रविवारपासून या वादळाचा प्रभाव हळूहळू कमकुवत होत असला तरी मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच आहे. रविवारी पुद्दुचेरी, कु•ालोर, विल्लुपुरम आणि चेन्नईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पुद्दुचेरीमध्ये 24 तासात 48.4 सेंमी पाऊस झाला. गेल्या 30 वर्षांतील एका दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. एनडीआरएफच्या टीमने पुद्दुचेरीच्या अट्टुपट्टी गावातून 64 जणांची सुटका करत त्यांना मदत केंद्रात नेले. कु•ालोरमध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. एनडीआरएफच्या पथकांनी लोकांना वाचवले. पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर के. कैलाशनाथन यांनी रविवारी पूरग्रस्त भागाला भेट दिली.

चेन्नईत पुराचा इशारा पाहून लोकांनी सकाळपासूनच आपली वाहने उ•ाणपुलावर उभी केली होती. चेन्नईत पावसामुळे माडेली सबवे तुडुंब भरला. ती काढण्यासाठी मोटार बसवावी लागली. वादळामुळे चेन्नई विमानतळ शनिवारी दुपारी 12 वाजता बंद करण्यात आले होते. येथील विमानसेवा रविवारी पहाटे 1 वाजल्यापासून संथपणे सुरू करण्यात आली. मध्यरात्रीनंतर उ•ाणे सुरू झाली असली तरी त्यापूर्वी अनेक उ•ाणे रद्द करण्यात आली. वादळामुळे 24 देशांतर्गत उ•ाणे रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. तर, 26 आंतरराष्ट्रीय उ•ाणांना विलंब झाला. चेन्नई विमानतळावरील एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये इंडिगोचे विमान लँडिंग दरम्यान वाऱ्याच्या झोतामुळे हवेतच कलंडल्यासारखे दिसून आले. तथापि, पायलटने समयसूचकता दाखवत अचूकपणे मार्गस्थ केल्याने दुर्घटना टळली.

फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नईच्या मरीना बीचला मोठा फटका बसला आहे. येथील किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. पावसामुळे चेन्नईलाही पूर आला होता. याच जलमय बनलेल्या रस्त्यांवर एक महिला एका मुलाला पाठीवर घेऊन रस्ता ओलांडताना दिसून आली.

आंध्रप्रदेशातही मुसळधार पाऊस

आंध्रप्रदेशची दक्षिण किनारपट्टी आणि रायलसीमा प्रदेशातील अनेक भागात हलका ते मध्यम किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नेल्लोर, तिरुपती आणि चित्तूर जिह्यांसह किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article